जि.प.प्रा.शाळा तपनेश्वर येथे चिखलाचे साम्राज्य,

जामखेड प्रतिनिधी 
सध्या पावसाळ्याचे दिवस असून जामखेड शहरातील तपनेश्वर रोडवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील शाळेच्या मैदानावर सर्वत्र चिखल झाला आहे. 
जि. प.प्राथ.शाळा तपनेश्वर येथे उतार नसल्यामुळे पावसाचे पाणी मैदानात साठवून राहते. पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नसल्यामुळे तेथे दलदल निर्माण होते. आजूबाजूंनी सर्वत्र चिखल व साठवून राहिलेल्या पाण्यामुळे डासांचा त्रास होतो. त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. तसेच बाजूनी कुंपण नसल्यामुळे तेथे मोकाट जनावरांचाही वावर असतो. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. 
शाळेला रस्ता नाही यासाठी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष धनराज पवार यांनी २० जून रोजी आमदार रोहित पवार यांना निवेदन दिले आहे. यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले की,रस्त्यासाठी सध्या निधी नसून सध्या मुलांना ये- जा करण्यासाठी तात्पुरते मुरूम टाकून कच्चा रस्ता करण्याचे स्विय सहायक सचिन मोकाशे यांना सांगितले होते. या रस्त्याच्या मुरुमसाठी सचिन मोकाशे यांनी निखिल जगताप यांना सांगितले होते.पंरतु त्यांनी धनराज पवार यांना सांगितले की, सध्या मुरूम उपलब्ध नाही.आले की टाकतो,स्विय सहायक मोकाशे यांनी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ तसेच जामखेड नगर परिषदेला फोन वरून संपर्क केला असता दोन्ही कार्यालयाकडून अद्याप कसलाही प्रतिसाद नाही. शाळेतील मुलांना शाळेत मोठी कसरत करावी लागते. 
साचलेल्या पाण्यामुळे मुलांना विविध प्रकारचे आजार होऊ शकतात.या मध्ये सर्दी, खोकला, ताप व डेंग्यू आजार संभवतात  शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष धनराज पवार यांनी वेळोवेळी अधिकारी व तसेच विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून मुरूम टाकण्याची मागणी केली.
       

Post a Comment

Previous Post Next Post