राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी १८ खेळाडू चंद्रपूरला रवाना, संजय कोठारींच्या हस्ते खेळाडूंना सुवर्णपदके

जामखेड प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या वतीने जामखेड येथे अहमदनगर जिल्हा कॅडेट, ज्युनियर व सिनिअर तायक्वांदो स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी जामखेडचे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना सुवर्ण रौप्य व कांस्यपदके देऊन सन्मानित करण्यात आले.

तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या (मुंबई) मान्यतेने महाराष्ट्र राज्य कॅडेट तायक्वांदो स्पर्धा, चंद्रपूर येथे दिनांक 19 ते 21 जुलै 2024 दरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्यातील विविध वजन गटातून प्रशांत ठुबे ,साईश ठाकूर ,यश नगरकर ,सोहम भिसे (सर्व अ. नगर ) ,शुभम काळे (राहता) ,सोहम गोल्हार (पाथर्डी) ,युगम नहार (राहुरी)
 मुली: सलोनी प्रसाद (नगर) ,साजिया शेख (राहता) ,श्रद्धा हाडोळे (राहता) ,ज्ञानेश्वरी रोडे (नगर) ,नूतन म्हस्के (राहता) ,कृतिका गिरी (राहता) ,साईशा बेंद्रे (राहता) ,संस्कृती शिंदे (राहता) यांनी आपले स्थान निश्चित केले आहे. 

तसेच महाराष्ट्र राज्य ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा, बीड येथे दिनांक 25 ते 27 जुलै 2024 रोजी होणार आहे. या स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्यातील आठ मुले व दहा मुलींनी आपले स्थान निश्चित केले आहे. यामध्ये आकांक्षा दराडे,हर्षदा हापसे ,वैष्णवी कदम (सर्व अ. नगर) ,ध्रुवा बेंद्रे (राहता) ,अनुष्का म्हस्के (राहता) ,साक्षी बडे (संगमनेर) ,मानसी डोळस (राहुरी) ,साक्षी तांबे ,पायल असलकर (पाथर्डी) ,दिव्या रेपाळे (राहता)
 मुले: संकेत शिरसाठ (पाथर्डी) गौरव एडके ,प्रतीक शिंदे (नगर) ,दर्शन सोने (राहता) ,आर्यन पोपळघट (नगर) ,आदेश म्हस्के (राहता) ,साईराज घोगरे (राहता) ,ओम बारगजे (जामखेड) या खेळाडूंचा समावेश आहे. 

त्याचबरोबर तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र च्या मान्यतेने लवकरच सीनियर गटातील राज्य स्पर्धेचेही आयोजन करण्यात येणार आहे त्याचीही निवड या जिल्हा स्पर्धेमध्ये घेण्यात आली. त्यामध्ये मुली: ईश्वरी घुले (संगमनेर) ,मिताली बारगजे (जामखेड) ,गायत्री बारगजे (जामखेड) ,स्वप्नाली घेमूड (पारनेर) ,प्रतीक्षा देवरे (राहता) ,श्वेता काळे (पारनेर) मुले: ओम बारगजे (जामखेड) तेजस त्रिभुवन (राहता) अजय तुपे, विशाल जंजाळ, यश शर्मा, अमोल जर्‍हाड, अक्षय साळुंके, रोहन मूरतडक (सर्व अ. नगर) वरील सर्व विजेत्या खेळाडूंना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या हस्ते सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या खेळाडूंना रौप्य व कांस्यपदके आणि प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी संजय बेरड दत्तात्रय उदारे उपस्थित होते. यावेळी संजय कोठारी यांनी विजेत्या खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात यांच्या अध्यक्षतेखाली जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते सकाळी स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, विश्वदर्शन नेटवर्कचे गुलाब जांभळे, संत गोरोबा कुंभार पतसंस्थेचे अध्यक्ष विनायक राऊत, अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोशिएशनचे अध्यक्ष डॉ एकनाथ मुंढे उपाध्यक्ष किरण बांगर सहसचिव अल्ताफ कडकाले रविंद्र शिर्के, उपस्थित होते. यावेळी अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव संतोष बारगजे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणचे प्रशिक्षक शकील सय्यद अंबादास साठे , सुरेश वाघ, सचिन आगळे, दिनेशसिंग राजपूत, गोरक्षनाथ गालम, महेश मुरादे, बाबासाहेब क्षिरसागर, संतोष परांडे लक्ष्मण शिंदे, रवि यादव, गणेश धिवर, शाम ब्राम्हणे यांच्यासह खेळाडूंनी विशेष परिश्रम घेतले.


Post a Comment

Previous Post Next Post