ल.ना.होशिंग विद्यालयामध्ये पायी दिंडी व वृक्ष दिंडी मोठ्या उत्साहात संपन्न

जामखेड प्रतिनिधी 
  ल.ना.होशिंग विद्यालया मधून शनिवारी पायी दिंडी व वृक्षदिंडी अतिशय मोठ्या उत्साहाने संपन्न झाली. सर्व बालगोपाळ मंडळी विविध वेशभूषेमध्ये एकत्र आल्यामुळे पायी दिंडी अतिशय सुंदर दिसत होती त्यामुळे आज जामखेड शहरात भक्तीमय वातावरण निर्मिती झाले होते. 

यावेळी श्रीनागेश्वर भजनी मंडळाचे जगन्नाथ धर्माधिकारी मेजर, दादासाहेब महाराज सातपुते, संतोष बारगजे, मनोहर गुरसाळी ,  त्र्यंबक वराट, गिरीधर ओझा,  ईश्वर परदेशी,पालक शिक्षक उपाध्यक्ष विजय काशीद. प्राचार्य श्रीकांत होशिंग,उपप्राचार्य सादिक शेख,उपमुख्यद्यापक रमेश चौधरी,पर्यवेक्षक प्रवीण गायकवाड,ईश्वर कोळी भाऊसाहेब,शिक्षण प्रतिनिधी संगीता दराडे.प्रमुख उपस्थिती होती.
गावांमध्ये विविध ठिकाणी पालकांनी मोठ्या उत्साहात पायी दिंडी व वृक्षदिंडी चे स्वागत, व औक्षण केले.
दिंडी परत शाळेत आल्यानंतर प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील साधुसंतांची परंपरा,पंढरपूर पायी यात्रेचे महत्त्व,त्याचबरोबर वृक्ष संवर्धन ही काळाची गरज यावर माहिती दिली असून विद्यार्थ्यांना वृक्षदिंडीनिमित्त पाचशे विविध झाडांचे वाटप करण्यात आले.

आज भजनी मंडळी यामुळे दिंडीला अतिशय गोडवा प्राप्त झाला.विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या आवाजात विठ्ठल नामाचा जयघोष करत रिंगण सोहळ्याचा खूप आनंद घेतला.विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टींची माहिती व्हावी याच संकल्पनेतून आज विद्यालयामध्ये वृक्षदिंडी व पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले.

मराठी विभाग प्रमुख अनिल देडे,गणित विभाग प्रमुख भरत लहाने,विज्ञान विभाग प्रमुख बबनराव राठोड,कलाशिक्षक राऊत मुकुंद, हिंदी प्रमुख पोपट जगदाळे, समारंभ प्रमुख आदित्य देशमुख, समाजशास्त्र विभाग प्रमुख विशाल पोले,रोहित घोडेस्वार, साई भोसले, उमाकांत कुलकर्णी, विजय क्षीरसागर,स्वप्निल जाधव,पंकज पोकळे,विनोद उगले,हनुमंत वराट,लक्ष्मण सोळंकी,विकास पाचरणे.शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी सर्वांच्या सहकार्य व संकल्पनेतून दिंडीचे नियोजन अतिशय उत्तम करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post