जामखेड प्रतिनिधी
परमपूज्य सुनंदाजी महासतीजी यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त जामखेड येथील सकल जैन समाज तर्फे १)सौतडा घाटात वृक्षारोपण करणार आहोत २) संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ वृद्धाश्रमातील वृद्धांना मिस्टांन्न भोजन देण्यात येईल ३) शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संचलित साकेश्वर गोशाळेतील गायांना हिरवा चारा देण्यात येणार आहे ४) श्री ब्रम्हनाथ सेवा प्रसार शिक्षण मंडळ संचलित निवासी मूकबधिर विद्यालयातील मुलांना मिष्टांन्न भोजन देणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तथा जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय कोठारी यांनी सांगितले.
यावेळी बोलताना संजय कोठारी म्हणाले जामखेड शहरांमध्ये १२ जुलैला महासतीजींचा प्रवेश झाला आज २० जुलै रोजी चातुर्मास सुरुवात होत आहे आणि२३ जुलैला महासतीजी चा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने रविवार दिनांक २१जुलै रोजी महासतीजीच्या वाढदिवसा निमित्त वरील कार्यक्रम होणार आहेत तरी सर्व जैन बांधवांनी हजर राहावे
या कार्यक्रमासाठी साखर सम्राट अशोक चोरडिया ,उद्योजक कांतीलाल कोठारी ,समाजसेवक संजय कोठारी ,सुभाष भळगट तसेच
प्रफुल्ल सोळंकी, सुमित चानोदिया, अनिल फिरोदिया ,संजय कटारिया, वैभव कटारिया ,प्रवीण छाजेड ,साहिल भंडारी ,संपतलाल बोरा ,विनोद बेदमुथा ,जितेंद्र बोरा, संतोष गुंदेचा , नवनीतलाल बोरा ,सुभाष भंडारी आदी उपस्थित राहणार आहेत.