श्रीनागेश्वर मंदिराला पुन्हा मूळ स्वरूप प्राप्त

  एकेकाळी नागेश्वर मंदिराकडे कोणी फिरकत नव्हतं रस्ते नव्हते भक्तांची वर्दळ नव्हती त्या काळात काही तरुणांनी पुढाकार घेऊन तेथे परिसर स्वच्छ केला नंतर हळूहळू तेथे सुधारणा होत गेल्या. जुन्या काळात या मंदिराला जे स्वरूप होतं ते स्वरूप आता पुन्हा प्राप्त झाले आहे. 

  मंदिराला वेळोवेळी रंग दिले जायचे ते दिलेले रंग काढून बांधकाम करताना जसे मंदिर होते तसेच दगडी मंदिर पुन्हा आता भक्तांना पाहायला मिळाले आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुकाप्रमुख पांडू राजे भोसले यांनी काही तरुणांना सोबत घेऊन तसेच नागेश्वर सेवा समितीचे जगदीश (बाबा) खराडे मिलिंद ब्रम्हे व सेवा मंडळातील अन्य भक्तांच्या सहकार्याने अथक परिश्रम करून वेळोवेळी दिलेले रंग काढून टाकले. त्याचबरोबर मंदिराची उंची वाढवण्यासाठी आखीव रेखीव व कोरीव दगडांचा वापर करून त्याची उंची वाढवली त्यामुळे आता या मंदिराने नवीन स्वरूप धारण केल्यासारखे वाटत आहे. 

  यानिमित्ताने वेळोवेळी काढलेले फोटो वाचकांच्या समोर देताना आम्हाला आनंद होत आहे. महाराष्ट्र न्यूज पोर्टलचे संपादक संतोष बारगजे यांनी 1999 साली व 2002 साली दैनिक सकाळ या वृत्तपत्रासाठी काही फोटो काढले होते. त्यापैकी 2002 साली काढलेला फोटो उपलब्ध आहेत.

  त्याच्याविषयी थोडेसे जाणून घेऊ व त्याचबरोबर जसे जसे नवीन रंग देण्यात आले त्या त्यावेळी श्री बारगजे यांनी काढलेले फोटो आज महाराष्ट्र न्यूज वर आम्ही प्रकाशित करत आहोत. 

  श्रीनागेश्वर सेवा मंडळाने मंदिर परिसर स्वच्छ केला होता. म्हणून दै. सकाळला बातमी देण्यासाठी नारायण राऊत यांनी त्यावेळचे दैनिक सकाळ चे बातमीदार संतोष बारगजे यांना आग्रह धरला. व 2002 साली श्री. प्रवीण राऊत हे श्री. बारगजे सर यांना श्रीनागेश्वर मंदिर येथे घेऊन गेले. त्यावेळी त्यांनी त्यांच्या कॅमेरात टिपलेले हे दोन छायाचित्र. हेच दोन फोटो त्यावेळी सकाळला प्रसिद्ध झाले 2004 साली श्रीनागेश्वर पालखी सोहळा सुरू झाला त्यावेळी पहिली बातमी सकाळ मध्ये प्रसिद्ध झाली होती त्याही बातमीला हेच दोन फोटो व त्यानंतर सर्व दैनिकात आणि सप्ताहाच्या पत्रिकेवर देखील हेच फोटो अनेक वर्ष होते. 

  नंतर रंग बदलला की प्रत्येक वेळी संतोष बारगजे यांनी आवर्जून नवीन फोटो घेतले ते काही फोटो... 


सध्याच्या फोटो... 

जाहिरात ⤵️




Post a Comment

Previous Post Next Post