बीडमध्ये तायक्वांदो खेळासाठी स्वतंत्र हॉल उभारू - डॉ. योगेश क्षीरसागर
बीड- शहरामध्ये तायक्वांदोला चांगले वातावरण असून, या आधुनिक खेळासाठी बीड शरामध्ये तायक्वांदोसाठी स्वतंत्र हॉल उभारण्याचासाठी नक्कीच प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांनी केले.
शहरातील क्रीडा संकुल येथील इनडोअर हॉल मध्ये ३४ व्या महाराष्ट्र राज्य जुनिअर तायक्वांदो स्पर्धेचे थाटात करण्यात आले. या स्पर्धेचे दीप प्रज्वलन डॉ योगेशजी क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. राज्य संघटनेचे महासचिव मिलिंद पठारे, अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, कोषाध्यक्ष वेंकटेश कररा यांनी ही दीप प्रज्वलन केले. यावेळी पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ उपस्थित होते.
या वेळी बोलताना डॉ योगेश क्षीरसागर म्हणाले, तायक्वांदो खेळा बद्दल वेगऴे आर्कषण निर्माण झाले आहे. या खेळामुळे शारीरिक क्षमताही वाढ होते. डॉ अविनाश बारगजे हे ३० वर्षापासून शहरात तायक्वांदोचे प्रशिक्षण देत आहेत. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू घडविले आहेत. नितीन कोटेचा यांच्या मागणी प्रमाणे शहरात तायक्वांदोसाठी अत्याधुनिक हॉल उभारण्याचा विचार असून त्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करेन, असे ही क्षीरसागर म्हणाले.
नितीन कोटेचा म्हणाले, बीड शहरात अनेक खेळांना योगेशदादांनी दिला आहे. तसेच, तायक्वांदोच्या राज्य स्पर्धेसाठी हाॉलच्या दुरुस्तीसाठीही त्यांनी मदत केली. त्याच प्रमाणे एक अत्याधुनिक हाॉलही त्यांनी द्यावा अशी मागणी यानिमित्ताने मी करतो, या मागणीचा योगेशदादा नक्कीच विचार करतील, असे कोटेचा म्हाणाले. आरटीओ अधिकारी स्वप्नील माने म्हणाले, आजचा दिवस अभिमानास्पद असाच आहे, कारण बीडमध्ये राज्य स्पर्धा होत आहे. शहरातून अनेक खेळाडू घडलेले आहेत. परंतु, इतर जिल्ह्यातील खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी बीडकरांना मिळाली आहे. इथे आलेले खेळाडू भविष्यात देशाचे प्रतिनिधीत्त्व करतील यात शंका नाही. आता, खेळ हा एक शिक्षणाचा भाग बनला आहे. अनेक पालक आपल्या मुलांना खेळाकडे वळाले आहेत. खेळालाही महत्त्व प्राप्त झाले आहे. यावेळी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नितिनचंद्र कोटेचा, राज्य संघटनेचे महासचिव मिलिंद पठारे, खजीनदार व्यंकटेश कर्रा, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, उपाध्यक्ष दुलिचंद मेश्राम, राजेश महाजन, विनायक ऐनापुरे, जयश्री बारगजे प्रा. तानाजी आगळे, संतोष बारगजे, डॉ विनोद पवार आदी व्यायसपीठावर उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार -
बीडचे आंतरराष्ट्रीय खेळाडू अविनाश पांचाळ, सचिन जायभाये, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेला खेळाडू श्रवण तांबारे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. बहारदार सांस्कृतीक कार्यक्रम सादर स्पर्धेच्या उद्घाटनानंतर ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भरतनाट्यमचे बहारदार नृत्य सादर केले, तसेच गणेश वंदनाचे नृत्य सादर करून उपस्थितांचे वाहवाह मिळविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद शिवनीकर, प्रास्ताविक डॉ. अविनाश बागरजे यांनी केले. डॉ शकील शेख यांनी आभार मानले.