प.पू. चंदनबालाजी म.सा.आणि प.पू. पद्मावतीजी म.सा. यांचा कोल्हार जैन स्थानकात भव्य प्रवेश

जामखेड प्रतिनिधी 
प.पू. चंदनबालाजी म.सा.आणि प.पू. पद्मावतीजी म.सा. यांचा कोल्हार जैन स्थानकात भव्य प्रवेश 
परमपूज्य चंदनबालाजी म.सा. आणि प.पू. पद्मावतीजी म.सा. आदी ठाणा सात यांचा कोल्हार भगवतीपूर येथील जैन स्थानकात भव्य चातुर्मास प्रवेश सोमवार दिनांक १५/७/२०२४ रोजी झाला अशी माहिती जैन श्रावक संघाचे अध्यक्ष नंदलाल भटेवरा यांनी दिली 
सकाळी कैवल्यधाम कोल्हार येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे. यावेळी महावीर भगवान की जय .आचार्य सम्राट आनऋषीजी महाराज की जय. आगे वाले बोलो जय महावीर पिछेवाले बोलो जय महावीर, अशा घोषणा देत मिरवणूक जैन स्थानकात पोहोचली यावेळी बाहेरून अनेक संघ आले होते या प्रवेशांमध्ये जामखेड येथून ३० जणांचा संघ सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, कांतीलाल कोठारी, सुभाष भंडारी यांनी आणला होता यावेळी प्रफुल्ल सोळंकी, दत्तनगर जैन स्थानकाचे अध्यक्ष बाळासाहेब धोका, राजेंद्र पिपाडा, सुभाष भळगट, सुमित चानोदिया , संजय कटारिया, अमृतलाल कोठारी, सतीश टाटिया,जवाहर गुंदेचा, उपस्थित होते
यावेळी कैवल्यधामच्या महासतीची परमपूज्य कैवल्यरत्नाश्रीजी 
महासतीजी यांनी विधिवत प्रवेश पूजा करून प्रवेशात सामील होऊन जैन स्थानकात प्रवेश केला यावेळी कोल्हार येथील जैन श्रावक संघाने उत्कृष्ट नियोजन केले होते पाठशाळेतील मुलांनी स्केटिंग वर प्रात्यक्षिक करून महासतीजींचे स्वागत केले त्यानंतर पाठ शाळेतील लहान मुला मुलींनी बऱ्याच नाटिका प्रस्तुत केल्या या कार्यक्रमात जामखेड येथील उद्योजक कांतीलाल कोठारी, बाळासाहेब धोका यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन अध्यक्ष नंदकुमार भटेवरा उपाध्यक्ष महेंद्र कुंकूलोळ सुनील कांकरीया सुधीर चोरडीया सुनील भटेवरा आधी जैन श्रावक संघाच्या कार्यकर्त्यांनी केले होते कार्यक्रमानंतर गौतम प्रसादी ठेवण्यात आली होती

Post a Comment

Previous Post Next Post