अहमदनगर ः खेलो इंडिया वुमेन्स लीगसाठी निवड झालेल्या मानसी डोळस हिचा सत्कार करताना जिल्हा सचिव संतोष बारगजे. समवेत वडील मिनीनाथ डोळस, प्रशिक्षक बाबासाहेब क्षीरसागर आदी.
अहमदनगर ता. 13 ः तामिळनाडू येथे 11 ते 14 दरम्यान होणाऱ्या भारत सरकारच्या मान्यतेने खेलो इंडिया वुमेन्स लीगसाठी अहमदनगर जिल्हा तायक्वांदो संघटनेची मानसी मिनीनाथ डोळस हिची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे, अशी माहिती जिल्हा सचिव संतोष बारगजे यांनी दिली.
तायक्वांदो खेळ ऑलिंपिक क्रीडा प्रकार असून, शालेय क्रीडा स्पर्धा, विद्यापीठ क्रीडा स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, पोलिस क्रीडा स्पर्धा, अशा शासकीय स्पर्धांसोबतच आता ‘अस्मिता खेलो इंडिया वुमन्स लीग’ मध्येही तायक्वांदो खेळाचा दोन वर्षीपासून समावेश झाला आहे. तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाकडे खेलो इंडिया स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी शासनाकडून देण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील खेळाडूंनी नेहमीच राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यावर्षी राहुरी येथील खेळाडू मानसी डोळसे हिची खेलो इंडिया वुमन्स लीगसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. तामिळनाडू येथे महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या निवडीबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.
खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ. एकनाथ मुंडे, सचिव संतोष बारगजे, सहसचिव अलताफ कडकाले, प्रशिक्षक बाबासाहेब क्षीरसागर, शकील सय्यद, अंबादास साठे, सुरेश वाघ, सचिन आगळे, दिनेशसिंग राजपूत, गोरक्षनाथ गालम, महेश मुरादे, लक्ष्मण शिंदे, रवी यादव, गणेश धीवर, शाम ब्राम्हणे आदींनी तिचे अभिनंदन केले आहे.