रणजित राऊत यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून एम. फिल. पदवी प्रदान

रणजित राऊत यांचे अभिनंदन करताना, मार्गदर्शक प्रा. डॉ. अनिल कुऱ्हे, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुनिल पोकळे, प्रा. डॉ. राम चव्हान, प्रा. डॉ. जे. डी. शेख

जामखेड  प्रतिनिधी : नुकत्याच पार पडलेल्या पदवी प्रदान समारंभात रणजित रावसाहेब राऊत यांना सावित्रीबाई  फुले पुणे विद्यापीठाची प्राणीशास्त्र विषयात एम. फिल. पदवी प्रदान करण्यात आली. रणजित राऊत यांनी "स्टडीज ऑन हेवी मेटल्स ॲक्कूमुलेशन अँड बायोकेमिकल कंटेंट इन सम कमर्शिअली इंपॉर्टन्ट बाईवाल्व मॉलुस्क्स फ्रॉम रत्नागिरी कोस्ट ऑफ महाराष्ट्र, इंडिया " या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित प्राणीशास्त्र विभाग संशोधन केंद्र, न्यु आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर येथे प्रबंध सादर केला. 

   यासाठी त्यांना पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय प्रवरानगर  येथील प्राणीशास्त्र विभागातील सहयोगी प्रा. डॉ. अनिल कुऱ्हे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी या विषयामध्ये रत्नागिरी येथील एकूण पाच प्रकारांमधील शिंपल्यांच्या प्रजातींचा अभ्यास करून त्यामध्ये आढळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या जड धातूंचे प्रमाण व  विविध आहार घटक या बाबतचे विश्लेषण केले आहे. त्यांच्या  प्रबंधाचे परिक्षण करण्यासाठी बहिस्थ परीक्षक म्हणून प्रा. डॉ. जे. डी. शेख, विभागप्रमुख प्राणीशास्त्र विभाग, मौलाना आझाद कॉलेज, छत्रपती संभाजीनगर व प्रा. डॉ. राम चव्हान, प्राणीशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर हे उपस्थीत होते. 

या संशोधनासाठी त्यांना  डॉ. बबन इंगोले (वरीष्ठ शास्त्रज्ञ), प्रा. डॉ. विश्वास चव्हान, प्रा. डॉ. जी. डी. सूर्यवंशी, प्रा. डॉ. रुपेंद्र भागडे, प्रा. डॉ. ए. एम. भोसले, प्रा. डॉ. बी. ए. पवार, प्रा. डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, प्राचार्य डॉ. एल. एस. मतकर, प्राचार्य डॉ. पी. एम. दिघे, प्राचार्य डॉ. फारुकी, प्रा. डॉ. विद्या प्रधान, प्रा. डॉ. सुनिल पोकळे, प्रा. डॉ. संतोष रणखांब, प्रा. डॉ. टि. एस. पठाण, प्रा. डॉ. विलास जीवतोडे यांचे ही सहकार्य व मार्गदर्शन लाभले. रणजित राऊत यांनी एम. फिल. पदवी संपादन केल्याबद्दल कॉलेजचे प्राचार्य डॉ. भास्कर झावरे, उपप्राचार्य प्रा. डॉ. आठरे, प्रा. डॉ. सागडे, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस. एन. पोकळे, डॉ. हरकळ, प्रा. डॉ. सतिश कुलकर्णी, प्रा. महेश आहेर, गणेश वाकचौरे, डॉ. समीर जाधव आदीसह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. रणजित राऊत यांनी एम. फिल. चा अभ्यासक्रम "ओ" श्रेणी घेऊन उत्तीर्ण करून पदवी प्रमाणपत्र प्राप्त केल्याबद्दल विविध मान्यवर, सहकारी संशोधक विद्यार्थी, मित्र व त्यांच्या परिवाराकडून कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post