जामखेड
जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत किलबिल गटातून जामखेड तालुक्यातील धनगरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची कु. सरल लहू बोराटे ने प्रथम क्रमांक मिळवला आहे. सरल ही जामखेड तालुक्यातील उकपक्रमशील शिक्षक लहू बोराटे सर यांची मुलगी आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात तेलंगशी केंद्रात देवदैठण अंतर्गत असलेली धनगरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहमीच चर्चेत असते. 41 पटसंख्या असलेल्या या शाळेत मुख्याध्यापक श्री.जालिंदर चिलगर सर. व श्री.लहू बोराटे सर. हे दोन शिक्षक नेहमी काहीतरी वेगळे उपक्रम राबवत असतात व त्यांचा प्रत्येक उपक्रम हा अन्य शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरतात बोराटे सर यांचे फेसबुक वर 82 हजारहून अधिक फॉलोवर्स आहेत. त्यांच्या शैक्षणिक व्हिडिओला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळालेला दिसतो. बोराटे सर यांनी सरलच्या हस्ताक्षराचा एक व्हिडिओ त्यांच्या स्वतःच्या फेसबुक वर टाकल्यानंतर तो व्हिडिओ आत्तापर्यंत 2.7 मिलियन लोकांनी पाहिलेला आहे. 12 हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तर दोन हजार आठशे लोकांनी सरलच्या हस्ताक्षराचे कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओमुळे तिच्या हस्ताक्षराची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. कुतूहल म्हणून अनेक जण हा व्हिडिओ आवर्जून पाहत आहेत. कारण दुसरीत शिकणाऱ्या सरलचे हस्ताक्षर मोत्यासारखे सुरेख आहे. हस्ताक्षरासोबत वक्तृत्व, समाजभान, व्हिडिओ शूटिंग, मैत्रीची भावना, सर्वांसोबत सहकार्याने व प्रेमाने वागणे, सतत आनंदी राहणे, आपली काम वेळच्यावेळी करणे असे अनेक गुण तिच्यामध्ये आहेत.
सरलच्या या यशाबद्दल गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, व तालुक्यातील शिक्षकांनी तसेच सर्वच क्षेत्रातील लोकांनी तिचे अभिनंदन केले आहे.