जामखेड प्रतिनिधी -
जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्था आणि गोंदिया जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमानाने निघालेली सायकलयात्रा सोमवारी जामखेडमध्ये.
पिंपळगाव जलाल (ता.येवला) येथील जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्था आणि गोंदिया जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमानाने पिंपळगाव जलाल ते अहिल्यानगर, जामखेड, खर्डा, येरमाळा, तुळजापूर , अक्कलकोट ते गाणगापूर सायकल यात्रेचे सोमवारी (ता.१३) जामखेडला आगमण होणार असून, जामखेड येथे जैन कॉन्फरन्स , कोठारी प्रतिष्ठान आणि समर्थ हॉस्पिटलच्या वतीने विशेष स्वागत सभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायकलयात्रेचे हे १९ वे वर्ष आहे.
कोठारी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संजय कोठारी यांच्या पुढाकारातून होणा-या स्वागत समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रम तहसीलदार गणेश माळी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अहिल्यानगरचे धर्मदाय आयुक्त बाबासाहेब शेकडे यांच्या हस्ते होणार आहे .या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक महेश पाटील, सायकल यात्रेत सहभागी असलेले दिवाणी न्यायाधीश डॉ.विक्रम आव्हाड व जय भवानी सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोरकडे,मुक्ताईनगरचे न्यायाधीश बाळासाहेब पवार, गोंदियाच्या न्यायाधीश संगीता विक्रम आव्हाड यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी डॉ भरत दारकुंडे,कोठारी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष कांतीलाल कोठारी , जैन कॉन्फ्रेंस चे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य वसंत लोढा, राजेंद्र बलदोटा, रोशन चोरडिया, पवन कटारिया, अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष योगेश भंडारी, अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे सचिव हेमंत पोखरणा, गटविकाश्र अधिकारी शुभम जाधव,सकाळ पत्रकार संतराम सूळ , लोकमत पत्रकार अशोक निमोणकर,साखर सम्राट अशोक चोरडिया, युवा उद्योजक प्रफुल्ल सोळंकी,वकील महासंगाचे अध्यक्ष ॲड प्रमोद राऊत , कॅप्टन लक्ष्मण भोरे, डॉ.अमोल भगत, धनंजय भोसले , युवा उद्योजक युवराज पोकळे , व्यापारी प्रवीण मंडलेचा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
स्वागत सभारंभाचे आयोजन सोमवारी (ता.१३) रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील राज लॉन्स येथे करण्यात आले असल्याची माहिती
कोठारी प्रतिष्ठानचे सचिव सुनील कोठारी आणि राहुल राकेचा यांनी दिली.