राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांना मातृशोक
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांच्या मातोश्री सुरेखाबाई सुभाषलाल कोठारी यांचेे दीर्घ आजाराने उपचारादरम्यान पुणे येथेे सोमवारी सायंकाळी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९० वर्षे होते.
सुरेखाबाई कोठारी या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाषशेठ कोठारी यांच्या पत्नी होत्या. वयाच्या ९० व्या वर्षी वृध्दापकालाने व आजारामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा अंत्यविधी आज मंगळवार दि १६। १२ ।२०२५ रोजी सकाळी ११ वा. तपनेश्वर अमरधाम, जामखेड येथे होईल.
सुरेखाबाई या सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व जामखेडचे माजी सरपंच सुनील कोठारी यांच्या त्या चुलती होत्या. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
Tags
निधन वार्ता