जामखेड एसटी आगारात स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंती उत्साहात साजरी

जामखेड प्रतिनिधी 
 दि. 12 डिसेंबर रोजी जामखेडच्या एस. टी. आगारात स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जामखेडचे जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, आगार व्यवस्थापक प्रमोद जगताप, शशिकांत खटावकर, अमित चिंतामणी , पोपट राळेभात, बाजीराव गोपाळघरे, पवन राळेभात, डॉ. भगवान मुरूमकर, प्रवीण सानप, संजय काशीद, सोमनाथ राळेभात, ज्ञानेश्वर अंदुरे, संदीप ठोंबरे, शिवाजी डोंगरे, महादेव राख,मारुती गंभीरे उपस्थित होते. 

गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जामखेड आगारातील सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी केली जाते. शुक्रवारी सकाळी जामखेड आगारातील श्रीदत्त मंदिराशेजारी हा जयंती सोहळा कार्यक्रम पार पडला. मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी आपल्या भाषणातून स्व. मुंडे साहेब यांच्या आठवणींना उजाळा दिला. 
या कार्यक्रमासाठी आगारातील बाळासाहेब  सानप, रामकिसन जायभाय, हनुमान आंधळे, विठ्ठल जायभाय, शरद राख, सुग्रीव जायभाय, अशोक दहिफळे, बाळू सारूक, गणेश मासाळ, सचिन मासाळ, विलास कांबळे, जीवन घायतडक, साईनाथ घुले, जगन्नाथ कराड, रामदास सांगळे, किरण जायभाय, शरद गाडे, नारायण घुले, गणेश वारे, काकासाहेब उगलमुगले, नाना माळी, कल्याण थोरात,  रघुनाथ वारे, दत्तात्रय जायभाय, विष्णू घुले आदींनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी आयोजकांनी महाप्रसादाची व्यवस्था कली होती.












Post a Comment

Previous Post Next Post