महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे (मुंबई) विद्यमान उपाध्यक्ष तथा जेष्ठ संघटक विनायक नारायण गायकवाड सर यांचे आजारपणामुळे आज दुपारी निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी, मयूर व गौरव हे दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
विनायक गायकवाड सर यांनी 1998, 99 पासून तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या राज्य संघटनेवर उपाध्यक्ष व त्यानंतर दीर्घकाळ खजिनदार पदावर काम केले. संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार ते स्वतः हाताळत असत. मुंबई येथे 'ताम'चे कार्यालय देखील त्यांच्याकडेच होते. कागदपत्रांमध्ये त्यांच्याकडे नेहमी तत्परता असायची. संघटनेचे संपूर्ण रेकॉर्ड सांभाळत असताना ते नेहमी अचूक काम करत असत. संपुर्ण महाराष्ट्रातील जिल्हा असोसिएशनवर त्यांचा अंकुश असायचा. त्यांच्या कामाची दखल घेत तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया TFI या शिखर संघटनेने सुद्धा त्यांना दोन वेळा खजिनदार पदाची जबाबदारी दिली. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई या संघटनेवर सध्या सर उपाध्यक्ष या पदावर कार्यरत होते. सुमारे दोन महिन्यापूर्वी त्यांना पोटात त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतु तब्येतीत पुन्हा बिघड झाल्याने त्यांना पुन्हा दुसर्यांदा शस्त्रक्रिया करण्याची गरज पडली. त्यातच त्यांना संसर्ग झाला असल्याचे समजते. मुंबई येथील सोमय्या रुग्णालयात उपचारादरम्यान आज त्यांची साडेचार च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळी. आणि संपूर्ण महाराष्ट्रातील तायक्वांदो प्रेमी खेळाडू संघटक यांच्यावर दुःखाचे चावट पसरले.
उद्या गुरुवारी( दि.16)दुपारी 12.30 वाजता भोईवाडा, काळा चोकी, मुंबई येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येतील.
तायक्वांदो खेळातील एक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील मोठे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे. श्री. विनायक गायकवाड सर यांना 'महाराष्ट्र न्यूज' तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील तायक्वांदो खेळाडू संघटक पंच प्रशिक्षक यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
Tags
क्रिडा