डोणगाव येथील अल्पवयीन मुलीची छेडछाड व विनयभंग



महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 

       डोणगाव येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. जामखेड पोलीस स्टेशन मध्ये याबाबत पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

     जामखेड पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या फिर्यादीत आकाश दादासाहेब धनवे, दादासाहेब मारुती धनवे, कृष्णा दादासाहेब धनवे, विशाल प्रकाश मोरे, प्रकाश गोरख मोरे
सर्व रा. डोणगाव ता. जामखेड यांच्या विरोधात जामखेड
पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली आहे. 

      फिर्यादीत मुलीच्या आईने म्हटले आहे की, दि. १२ रोजी
शेतातुन जनावरांना चारापाणी करून आमच्या राहत्या घरी
आले. त्यावेळी माझी मुलगी रडत होती. त्यामुळे मी का
रडत आहे, असे विचारले असता तिने सांगितले की, आज
शाळा सुटल्यावर मी व माझ्या मैत्रिणीं सोबत आपल्या
गावातील खंडोबाच्या मंदीरात पाया पडायला गेलो होतो.
त्या ठिकाणी आकाश दादासाहेब धनवे याने माझा हात
धरून ओढले व तु मला खुप आवडते असे म्हणाला तसेच
आकाश याने, चार पाच दिवसा पूर्वी मला डोळा मारला
होता. त्यावेळी मी खुप घाबरलेली होते. असे माझ्या मुलीने मला सांगितल्या नंतर काही वेळाने माझा
नवरा घरी आल्यावर त्यांना प्रकार सांगितला त्यानंतर
सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मी माझा नवरा
दीर असे सर्वजण दादासाहेब धनवे यांचे घरी जाब
विच्यारण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी असलेले वरील
आरोपी हे सर्वांनी आमचे काही एक ऐकून न घेता हातात
काठ्या घेऊन आमच्या अंगावर धावुन आले तसेच
शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईने जामखेड पोलीस
स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून वरील पाच आरोपीं
विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला छेडछाड व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती हे करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post