प्रमिला उगले आणि शकुंतला पवार यांनी केला मरणोत्तर देहदानाचा संकल्प


जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड आयोजित देहदान संकल्प अभियानात...

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
बुधवार दिनांक १३/७/२०२३ रोजी सौ. प्रमिला हेमंत उगले वय ५५ मुक्काम पोस्ट नायगाव तालुका जामखेड यांनी आणि सौ. शकुंतला आप्पासाहेब पवार वय ७४ मुक्काम पोस्ट सारोळा तालुका जामखेड रिटायर मुख्याध्यापिका (नान्नज )आज कोठारी प्रतिष्ठानच्या ऑफिसमध्ये येऊन स्वतःचा मरणोत्तर संकल्प देहदान अभियान अंतर्गत फॉर्म भरलेला आहे. 

यावेळी बोलताना उगले नाना म्हणाले मी जामखेड येथे कृषी अधिकारी म्हणून काम केले माझ्या पत्नीची बऱ्याच दिवसापासून देहदान संकल्प अभियानात फार्म भरायची इच्छा होती जामखेड येथील नीलम हवालदार यांनी मला जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्याकडे देहदान फॉर्म भरले जातात अशी माहिती दिली आणि त्यांचे सामाजिक कार्य खूप उल्लेखनीय आहे अपघातातील लोकांना वाचवायचे काम त्यांनी बऱ्याच वर्षापासून चालू ठेवले आहे. कोरोना काळामध्ये त्यांनी खूप मोठे काम केले आहे. 

यावेळी बोलताना हेमंत नाना उगले म्हणाले माझ्या पत्नीने देहदान संकल्प अभियाना मध्ये फॉर्म भरलेला आहे देहदान केल्यानंतर एका देहा पासून अनेक डॉक्टर बनतील आणि अनेकांचे प्राण वाचवतील माणूस मेल्यानंतर त्याची राख होण्यापेक्षा आपला देह कोणाचे तरी कामाला यावा या उद्देशानेआम्ही आज जैन कॉन्फरन्स आणि कोठारी प्रतिष्ठान यांच्या ऑफिसला येऊन स्वखुशीने फॉर्म भरत आहे. 

तसेच यावेळी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक आप्पासाहेब महादेव पवार म्हणाले मला सुद्धा सौ निलम हवलदार यांनी ही माहिती दिली म्हणून मी माझ्या पत्नीला सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्याकडे तिच्या स्वखुशीने देहदांनचा फॉर्म भरण्यास आणले सगळी माहिती ऐकून मला खूप आनंद वाटला. 

यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले आम्ही जैन कॉन्फरन्स आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड अंतर्गत आत्तापर्यंत ४७७ जणांनी देहदान चे फॉर्म भरले असून ११ जणांनी डोळे दान, अवयव दान, देह दान केलेले आहेत. या कामात डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन मेडिकल कॉलेज अहमदनगर यांचे आणि डॉ. सुधीर पवार यांचे सहकार्य लाभले
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, हेमंत (नाना) उगले, आप्पासाहेब पवार ,सौ नीलम हवलदार, राजेंद्र वारे आदीं उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post