एकाच दिवशी दोन अपघात एकाचा मृत्यु, तर संजय कोठारी यांनी वाचवले दोघाचे प्राण

अपघातात अजुन किती माणसे मारणार सामाजिक कार्यकर्ता संजय कोठारी चा सवाल

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
जामखेड येथे एकाच दिवशी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एकाचा जागीच मृत्यु झाला आहे. तर इतर दोघाना संजय कोठारी यांनी केलेल्या तातडीच्या मदतीमुळे जीवदान मिळाले आहे. मात्र खराब रस्त्यामुळेच हे अपघात होत असुन अजुन किती जणांचे प्राण गेल्यावर रस्त्याची कामे करणार असा सवाल सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी उपस्थित केला आहे. 

कर्जत रोडवर झालेल्या दुचाकी वाहनांच्या अपघातात सचिन सुखदेव गव्हाणे वय 25 मु. पो. ढवळगाव ता. श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर यांचा मृत्यू झाला आहे. 

तर दुसर्‍या अपघातात बाबू विलास सकट वय 16 आणि युवराज संभाजी गायकवाड वय 45 दोघे जबर जखमी झाले आहेत. या दोघांना संजय कोठारी यांनी तात्काळ आपल्या रुग्णवाहिकेतून जामखेड येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले त्यामुळे या दोघांचे प्राण वाचले.

जामखेड शहरास जोडणाऱ्या आणी शहरालगत असणाऱ्या सर्वच रस्त्याची अवस्था हि कित्येक दिवसा पासुन अतीशय खराब झालेली असल्याने याच खराब रस्त्यामुळे सतत येथे अपघातीची मालीका सुरू आहे. त्यात अनेक निष्पाप नागरीकांचे बळी जात आहेत. तर काही अपंग लुळे खुळे होऊन हतबल होत आहेत. तरीही या गंभीर प्रश्नाकडे सार्वजनिक बांधकाम खाते अथवा लोक नेते लोक प्रतिनिधी डोळे झाकच करताना दिसत आहेत. तेव्हा आजुन किती रोड अपघाताचे बळी गेल्यावर रस्त्याचे सुधारणा करणार असा सवाल जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा अपघातातील व्यक्ती साठी तातडीने धावणारे देवदुत अवलीया संजय कोठारी यांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाच्या हालगर्जी पणाची जाणीव करून दिली आहे मात्र प्रशासन आता तरी दखल घेईल का  हा प्रश्न आहे. कारण गेल्या एका महिन्यात जामखेड शहर पंचक्रोशीत व परिसरात एकुण पंचवीस लहान मोठे अपघात झाल्याची माहीती मिळतेय. त्यातच सोमवार दि १७ जुलै रोजी जामखेड शहरात पुन्हा झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एकाचा चिरडुन जागीच मृत्यु तर दोन जण गंभीर जखमी झाले. नेहमी प्रमाणेच आपले कर्तव्य समजुन सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी धावपळ करत अपघात ग्रस्तास मदत व सहकार्य करत वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने दोघांचे प्राण वाचले. 

 त्यामुळे हे सर्व अपघात फक्त आणी फक्त खराब रस्त्या मुळेच होत असल्याची खंत कोठारी यांनी व्यक्त करत आणखीन इतरांचे बळी जाण्या अगोदर रस्त्याची कामे पुर्ण होतील का ? असा प्रश्न उपस्थित केलाआहे .

तर कालच्या अपघातातील व्यक्तीना मदत करत असताना संतोष नवलखा ,राजेद्र भुजबळ ,गोकुळ जाधव ,निखील कुमकर ,सुनील मोरे इत्यादि सह उपस्थितांनी संजय कोठारीना मोलाचे सहकार्य केले

चौकट
तसेच अपघातातील जखमीला किंवा मुतदेह आणल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी नसल्यामुळे अर्धा अर्धा तास तसेच गाडीत किंवा जखमीला ठेवा लागते अखेर लोकांना विनंती करून जमलेल्या लोकांपैकी लोकांना विनंती करून खाली उतरून ते मृतदेह जखमी लोक दवाखान्यात मला स्वतः पुढाकार घेऊन उतरून घ्यावे लागतात असे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले. 




Post a Comment

Previous Post Next Post