श्री संत भगवान बाबा विशेषांकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

पाथर्डी . प्रतिनिधी. विजयादशमीनिमित्त दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या श्री संत भगवान बाबा विशेषांकासाठी भगवान बाबाच्या जीवनावर आधारित लेख, कविता, दुर्मिळ छायाचित्र यावर आधारित साहित्य पाठवावे, असे आव्हान श्री संत भूमी कला क्रीडा प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव प्रा. जनार्दन बोडखे यांनी केले आहे. संत भगवान बाबांनी मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाज जागृती व प्रबोधनाचे भरीव काम केले आहे. भगवान बाबांनी त्यांच्या अवतर काळात सामान्यातील सामान्य भक्तांना भगवंत भक्तीची दिशा दाखवली अशा थोर महात्म्याला अभिवादन करण्याची परंपरा आम्ही दरवर्षी या अंकातून राखत आलो आहोत.

आपले साहित्य. सिद्धी मेडिकल नवी पेठ पाथर्डी. ता. पाथर्डी. जि. अहमदनगर या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन प्रा. बोडखे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी भ्रमण दूरध्वनी. क्र 94 21 47 91 80.

Post a Comment

Previous Post Next Post