महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
मनोज जरांगे पाटील हे शुक्रवारी जामखेड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी जामखेड तालुक्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चोंडी येथे भेट दिली . यावेळी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या ठिकाणी आमदार राम शिंदे यांनी जरांगे पाटील यांचे स्वागत केले.
यावेळी आमदार प्रा. राम शिंदे यांच्यासह माजी सभापती डॉ.भगवान मुरुमकर,बाजार समितीचे सभापती शरद कार्ले,सचिन गायवळ, रवि सुरवसे, अजय काशिद,गौतम उत्तेकर, प्रथम नगराध्यक्ष विकास राळेभात, अमित चिंतामणी, बिभिषण धनवडे, सोमनाथ राळेभात, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, मोहन गडदे,लहू शिंदे, मंगेश आजबे, सोमनाथ पाचारणे, रमेश आजबे, तुषार पवार, ॲड.प्रवीण सानप, अविनाश शिंदे, पांडुरंग उबाळे, अक्षय शिंदे, चोंडीचे सरपंच सुनील उबाळे आदी उपस्थित होते.