अहमदनगर - क्रीडा व युवक सेवा
संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, लातूर जिल्हा व तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने लातुरात शालेय राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील ६०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
या स्पर्धेमध्ये पुणे विभागीय संघातून नगरच्या अनेक खेळाडूंनी प्रतिनिधित्व केले. त्यापैकी कालमेल स्कूल अहमदनगर ची अनन्या रणसिंग, कॉन्व्हेंट हायस्कूलची सलोनी प्रसाद, रुपीबाई विद्यालयाची वैष्णवी बेरड तर रेसिडेन्शिअल हायस्कूल चा विद्यार्थी सार्थक निमसे या चौघांनी राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. हे चारही खेळाडू काटोल, मध्यप्रदेश मध्ये ३१ डिसेंबर २०२३ ते ५ जानेवारी २०२४ दरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहेत.
याच स्पर्धेत साई निवडुंगे याने (रेसिडेन्सील अ. नगर) रौप्यपदक तर पाथर्डी येथील श्री विवेकानंद विद्यामंदिरचा विद्यार्थी संकेत शिरसाठ याने कास्यपदक मिळविले आहे.
लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलातील इनडोअर हॉलमध्ये राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार विजेते मिलिंद पठारे यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्य संघटनेचे अध्यक्ष तथा शासनच्या तांत्रिक समिती सदस्य डॉ. अविनाश बारगजे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील, व्यंकटेश कररा, राजेश महाजन, तांत्रिक समिती सदस्य प्रमोद दौंडे यांची उपस्थिती लाभली. या २१ ते २३ डिसेंबर २०२३ पार पडलेल्या राज्य शालेय तायक्वांदो स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडाधिकारी जगन्नाथ लकडे, तालुका क्रीडाधिकारी सुरेंद्र कराड, सारिका काळे, क्रीडाधिकारी जयराज मुंडे, जिल्हा संघटनेचे सचिव नेताजी जाधव परिश्रम घेतले .
या सर्व पदक विजेत्या खेळाडूंना अ. नगर येथील तायक्वांदो प्रशिक्षक शकील सय्यद, सुरेश वाघ, रवि यादव, गणेश धिवर पाथर्डी येथील प्रशिक्षक शंकर जेधे, अंबादास साठे, गोरक्षनाथ गालम, सागर सानप यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष डॉ एकनाथ मुंढे सचिव संतोष बारगजे उपाध्यक्ष किरण बांगर सहसचिव अलताफ कडकाले रविंद्र शिर्के, बाबासाहेब क्षिरसागर, प्रभाकर शेळके, अमोल बोधक, दिनेशसिंग राजपूत, महेश मुरादे ब्रह्मचैतन्य राजगुरू, लक्ष्मण शिंदे, संतोष परांडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Must .....
ReplyDeleteCongratulations to all team Ahmednagar
ReplyDelete