राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत नगरच्या वैष्णवी बेरड व अनन्या रणसिंग ला सुवर्णपदक


    महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
    शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत अहमदनगरच्या खेळाडूंनी दोन सुवर्ण, एक ब्रांझपदक पटकावले आहे. शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा मध्यप्रदेशातील बैतुल येथे आयोजित केल्या होत्या. या स्पर्धा कोरोना नंतर प्रथमच बैतुल येथे या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 

    शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत नगरच्या कार्मेल स्कूलची अनन्या रणसिंग व रुपीबाई विद्यालयाची वैष्णवी बेरड यांनी सुवर्णपदक पटकावले आहे, तर रेसिडेन्शिअल हायस्कूलच्या सार्थक निमसेने ब्रांझ पदक पटकावले. अनन्याने अंतिम सामन्‍यात ‘केव्हीसी’च्या खेळाडूचा १८-२० ने पराभव करून सुवर्णपदक पटकावले, तर वैष्णवीने अंतिम सामन्‍यात गुजरातच्या खेळाडूचा २०-२२ ने पराभव करून सुवर्णपदक पटकावले. सार्थकने ब्रांझपदक पटकावले आहे. 

    या सर्व पदक विजेत्या खेळाडूंना अहमदनगर येथील तायक्वांदो प्रशिक्षक शकील सय्यद, सुरेश वाघ, रवी यादव, गणेश धीवर,  यांचे मार्गदर्शन लाभले. 

    या यशाबद्दल विजेत्या खेळाडूंचे अहमदनगरचे जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, क्रीडा मार्गदर्शक तथा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे शिवछत्रपती पुरस्कार विजेते तथा तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई चे महासचिव मिलिंद पठारे राज्य संघटनेचे अध्यक्ष तथा शासनच्या तांत्रिक समिती सदस्य डॉ. अविनाश बारगजे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील, व्यंकटेश कररा, राजेश महाजन, अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एकनाथ मुंढे, सचिव संतोष बारगजे, उपाध्यक्ष किरण बांगर, सहसचिव अलताफ कडकाले,रवींद्र शिर्के, बाबासाहेब क्षीरसागर, प्रभाकर शेळके, अमोल बोधक, दिनेशसिंग राजपूत, महेश मुरादे, ब्रह्मचैतन्य राजगुरू, लक्ष्मण शिंदे, संतोष परांडे पाथर्डीचे प्रशिक्षक शंकर जेधे, अंबादास साठे, गोरक्षनाथ गालम, सागर सानप आदींनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post