कोठारी प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क;  स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड मार्फत करण्यात आली

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते म्हणाले आम्ही बऱ्याच वर्षापासून सर्व महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करत असतो आज आपण या महापुरुषामुळेच आहोत असे संजय कोठारी म्हणाले आज आमचे भाग्यच म्हणावे लागेल की आम्हाला अशा महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरा करायचा योग मिळतो.

    तसेच यावेळी बोलताना उद्योगपती आनंद गुगळे म्हणाले आम्ही कोठारी प्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतो संजय कोठारी यांचे नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात छत्रपती शिवाजी महाराज जयंती करण्याचा योग आला खूप आनंद वाटला 

    यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, उद्योगपती आनंद गुगळे, अरुण लटके, सागर साबळे, महेश आडाले, आधी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post