बदनापूरात शिवजयंती निमित्त शिक्षक भारती व मराठा सेवा संघाच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न.


बदनापूर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिक्षक भारती संघटना व मराठा सेवा संघाच्या वतीने जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 29 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी श्री. दत्तात्रय क्षीरसागर यांनी केले. या कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक श्री. बंटेवाड साहेब, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष तथा केंद्रप्रमुख श्री.बोर्डे बापू, राष्ट्रवादीचे तालुका नेते परमेश्वर नाईकवाडे, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष दीपक दराडे, कार्याध्यक्ष देवेंद्र बारगजे, शिक्षक समितीचे राज्य पदाधिकारी मधुकर काकडे,शिक्षक भारती कोषाध्यक्ष  ज्ञानेश्वर राऊत, शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष सुभाष भडांगे, अखिल शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष अरुण हिवाळे, शिक्षक परिषदेचे तालुका नेते निलेश सोमवंशी, इंजिनीयर संदीप केदारे,  शिक्षक भारती जालना तालुका अध्यक्ष तीळवणे सर आदींची उपस्थिती होती.

रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष श्री दीपक दराडे यांनी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महापुरुषांना अभिवादन केले जाते त्यामुळे अशा शिबिराचे दरवर्षी आयोजन व्हावे असे आवाहन केले. सर्व रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होते' हे पुस्तक व प्रमाणपत्र देण्यात आले. रक्तदान शिबिर लायन्स क्लब औरंगाबाद रक्तपेढी यांच्या मदतीने घेण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक भारती बदनापूर तालुकाध्यक्ष सतीश नागवे, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष गणेश शिनगारे, बाबासाहेब कडोस, डिगांबर गाडेकर, विजय शेडगे, रामदास फतपुरे, विजय गाडेकर, लहू कराड, सचिन जोशी, शशिकांत काचे, रामेश्वर काळे, महेश कराळे, विनोद कुलट, जयप्रकाश शिंदे, गंगाधर कराड, सुभाष मोरे, लॉयन्स बल्ड सेंटर छत्रपती संभाजीनगर चे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post