महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
आज दि. 3/4 /2023 रोजी जामखेड येथील प्रसिद्ध कांदा व्यापारी जहीर शेख यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे उमेदवारीसाठी आपला अर्ज दाखल केला. तसेच शैतकरी व व्यापारी संघटनेकडुन आ. रोहित दादा पवार यांना उमेदवारीसाठी मागणी केली. जहीर शेख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे की मी शेतकऱ्यांच्या प्रश्न व अनुदानासाठी तसेच बाजारातील व्यापाऱ्याच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील त्याच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
यावेळी उपस्थित संतोष गोरे, गणेश ढगे, अमोल ढगे, सदाशिव ढगे अरिफ शेख, आन्सार पठाण, भाऊसाहेब वराट, मुस्तफा शेख (मेजर) , सुंदरदास बिरंगल साहेब, निलेश पवार (बावी सरपंच) नय्युम शेख, कल्लीमुल कुरेशी (कलु चाचा), जाकीर सय्यद, हनीफ कुरेशी, अबरार कुरेशी, मारूफ कुरेशी, मदनीभाई कुरेशी तसेच बहुसंख्य शैतकरी व व्यापारी संघटना मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामध्ये कृषि पतसंस्था आणि बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदारसंघातून 11 सदस्य निवडले जाणार आहेत. या मतदारसंघात सर्वसाधारण 7, महिला राखीव 2, इतर मागास प्रवर्ग 1, विमुक्त जाती / भटक्या जाती 1 असे उमेदवार निवडले जाणार आहेत. तर ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी या मतदारसंघासाठी 4 जागा आहेत. यामध्ये सर्वसाधारण 2, अनुसूचित जाती जमाती 1 आणि आर्थिक दुर्बल घटक 1 असे सदस्य निवडले जाणार आहेत. व्यापारी / आडते मतदारसंघासाठी 2 जागा आहेत. हमाल/ मापाडी मतदारसंघासाठी 1 जागा आहे. असे एकुण 18 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सहाय्यक निबंधक जामखेड हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. वैध अर्जाची यादी प्रसिद्ध करणे - 6 एप्रिल 2023 ( सकाळी 11 वाजता) निवडणूक कार्यालय व संस्था नोटीस बोर्ड अर्ज मागे घेण्याची तारीख - 6 एप्रिल 2023 ते 20 एप्रिल 2023 (सकाळी 11 ते दुपारी 3 ) निवडणूक कार्यालय
चिन्ह वाटप 21 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता ( - निवडणूक कार्यालय व संस्था नोटीस बोर्ड) मतदान - 30 एप्रिल 2023 (वेळ सकाळी 8 ते 4 ) स्थळ नंतर घोषित करण्यात येईल निकाल - 30 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता निकाल घोषणा - मतमोजणी दिवशी ठिकाण व निकाल तारीख जाहीर करण्यात येईल.