महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या (कडा)अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल योगेश भंडारी यांचा कोठारी प्रतिष्ठान मार्फत सत्कार करण्यात आला
नुकतेच 2023 मध्ये बिनविरोध निवड झाल्यामुळे जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आपल्या मित्रा समवेत कडा येथील भंडारी यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची पण संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.
यावेळी जामखेड येथील प्रसिद्ध उद्योगपती प्रवीणशेठ छाजेड, मेडिकल असोसिएशनचे मा.अध्यक्ष सुभाष भळगट, शांतिलाल गांधी, विठ्ठृल पराड़कर आदि उपस्थित होते
यावेळी नूतन अध्यक्ष योगेश भंडारी म्हणाले आता माझ्यावर अध्यक्ष पदाची खूप मोठी जबाबदारी आहे मी सर्वांना बरोबर घेऊन काम करेल संस्थेच्या प्रत्येक कामात हिरारीने भाग घेऊन संस्था वाढवण्याचे काम करेन आज कोठारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय कोठारी यांनी माझ्या ऑफिस मध्ये येऊन माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे तसेच त्यांची सुद्धा अमोल विद्या प्रसारक मंडळाच्या संचालक पदी निवड झालेली आहे.