आजच्या धकाधकीच्या जीवनात वृध्दांची सेवा होणे आवश्यक आहे, हभप गहिनीनाथ लोखंडे महाराज



महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
 1 मे 2023 रोजी स्व. आशालताच्या दुसर्‍या स्मृती दिनानिमित्त संत ज्ञानेश्वर माऊली वृध्दाश्रम नळी वडगाव, ता भुम जिल्हा उस्मानाबाद येथील वृध्दांना अन्नदान करून जेष्ठ पत्रकार प्रकाश खंडागळे लिखीत व शब्दगंध प्रकाशन अहमदनगर  प्रकाशित  "एक होती आशा" या पुस्तकाचे प्रकाशन हभप गहिनीनाथ लोखंडे महाराज यांचे हस्ते  करण्यात आले. या वेळी हभप गहिनीनाथ लोखंडे महाराज बोलत होते. 

2016 साली नळी वडगाव शिवारातील गायरान भागात जेष्ठ संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ वृध्दाश्रम सुरू करण्यात आलेला आहे. दररोज गावात जाऊन माधुरी गोळा करून येथील वृध्दांना सांभाळले जात आहे. काही अन्नदाते मोठी मदत करत असतात. तसेच येथे भव्यदिव्य असे संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदीर बांधण्याचे आयोजन करण्यात आले आहे. येथील हवा, पाणी, डोंगर, झाडी मनाला भुरळ घालणारी आहे. त्यामुळे येथे निसर्ग प्रेमी मोठ्या संख्येने भेट देतात.

या वेळी जेष्ठ पत्रकार प्रकाश खंडागळे, सा नगर व्हिजनचे संपादक संजय वारभोग, दै प्रभात तालुका प्रतिनिधी ओंकार दळवी, दै सार्वमत तालुका प्रतिनिधी समीर शेख, सा पोलीस वारंट संपादिका  कु स्वेता गायकवाड आदी उपस्थित होते. 

पुढे बोलताना लोखंडे महाराज म्हणाले कि, समाजात आई वडीलांना मुले सांभाळत नाहीत. जीवनाच्या अखेरच्या दिवसात वृध्दाची काळजी कोणीही करत नसल्याने वृध्दाश्रमाची संख्या वाढताना दिसत आहेत. अखेरच्या क्षणाला ही कोणी येत नाही, हि मोठी समस्या आहे. सद्यस्थितीत येथे तीस चाळीस वृध्दांची सोय करण्यात आली आहे. 

मागिल वर्षी आशालता यांचे वर्ष श्राध्द येथेच साजरे केले होते.  "एक होती आशा" जेष्ठ पत्रकार प्रकाश खंडागळे लिखीत व शब्दगंध प्रकाशन अहमदनगर प्रकाशित पुस्तकाचे प्रकाशन येथे झाल्याने सर्व आश्रमवाशीयांना मोठा आनंद झाला आहे, असे प्रसंग क्वचित येथे घडत आहेत. आशालता यांचे पुस्तक पाहून सर्वांना आनंद झाला आहे. पुस्तकासाठी आम्हासर्वाच्या खुप शुभेच्छा! 

जेष्ठ पत्रकार प्रकाश खंडागळे यांनी प्रस्ताविक केले तर पत्रकार संजय वारभोग, पत्रकार ओंकार दळवी यांनी मनोगत व्यक्त केले. हभप गहिनीनाथ लोखंडे महाराज यांनी आभार मानले. 


Post a Comment

Previous Post Next Post