महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
जामखेड पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेचे सर्वच स्तरावर काम चांगले आहे. हे आज आजीनाथ जाधव यांच्या निरोप समारंभच्या कार्यक्रमासाठी उपस्थित नागरिकांच्या संख्येवरून दिसून येत आहे. यापुढे ते चांगलेच राहिल मात्र यासाठी नागरिकांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले.
जामखेड पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी आजीनाथ जाधव यांची श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे बदली झाल्याच्या पार्श्वभूमीवर जामखेड शहर वाहतूक शाखेच्या वतीने त्यांच्या निरोप सभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक महेश पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंगेश आजबे, समस्त भिमसैनिक जामखेड तालुक्याचे विकीभाऊ सदाफुले, भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष मोहन गडदे (मामा), कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक विष्णू भोंडवे, भारतीय बौद्ध महासभेच्या सुरेखा अनिल सदाफुले, सुरेखा रत्नाकर सदाफुले, गफार पठाण, पोलीस नाईक अजय साठे, अविनाश ढेरे, तागड, पोलीस काॅन्स्टेबल दिनेश गंगे, प्रकाश जाधव, सचिन देवढे, भास्कर सदाफुले सर. होमगार्ड हरिश्चंद्र पवार, होमगार्ड रफिक तांबोळी आदिंसह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
सत्कारास उत्तर देताना आजीनाथ जाधव म्हणाले की, गेली पाच वर्षे काम करताना जामखेडकरांनी दिलेले प्रेम व सहकार्य हे मला नेहमीच प्रेरणा देत राहिलं, जामखेड पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व सद्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील साहेब यांचे अनमोल असे मार्गदर्शन व इतर पोलीस कर्मचाऱ्याचे योग्य सहकार्य लाभले म्हणून मी माझ्या ५ वर्षांच्या काळात चांगले काम करू शकलो."
यावेळी विविध पक्षसंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तर अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लियाकत शेख तर आभार दिनेश गंगे यांनी मानले.