मंत्री धनंजय मुंडे यांचे जामखेडमध्ये जोरदार स्वागत


जामखेड प्रतिनिधी 
मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नगरहून परळीकडे जात असताना मंत्री धनंजय मुंडे यांचा जामखेड शहरात सत्कार करण्यात आला. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी सत्कार प्रसंगी राजकीय बोलणे टाळत फक्त कार्यकर्त्यांची विचारपुस केली.

नगरमधील दौरा अटोपून मंत्री धनंजय मुंडे हे परळीकडे जात होते. दुपारी जामखेड शहरात त्यांचे आगमन झाले.  तालुक्यातील धनंजय मुंडे समर्थकांसह भाजप कार्यकर्ते व  समाज बांधव खर्डा चौक परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री मुंडे यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे माजी संचालक काकासाहेब गर्जे, मोहा ग्रामपंचायतचे सरपंच शिवाजी डोंगरे, भाजपा विधीसेवा जिल्हाध्यक्ष प्रवीण सानप, बाजीराव गोपाळघरे, बाळासाहेब गोपाळघरे तसेच 
भाजप कार्यकर्ते व  समाज बांधवांनी खर्डा चौक परिसरात बॅनरबाजी व स्वागत कमानी लावल्या होत्या. दुपारी एकच्या दरम्यान मंत्र्याचे आगमन होताच क्रेनच्या सहाय्याने भलामोठा हार अर्पण करून मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच काही कार्यकर्त्यांनी हार-पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या भुमिकेचे समर्थन केले. मंत्री मुंडे यांनीही कार्यकर्त्यांची विचारपुस केली. मात्र या कार्यक्रमात मुंडे यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले. 
 

तत्पूर्वी मुंडे येणार असलेल्या मार्गावर राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या समर्थनाचे फलक हातात घेत. मंत्री मुंडे यांचा निषेध केला. पोलिसांनी तत्काळ त्यापैकी सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले, अन्सार शेख या तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

Post a Comment

Previous Post Next Post