पुजाचा कोठारी परिवाराच्या वतीने सन्मान
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क:
जामखेडचे माजी सरपंच सुनील कोठारी व सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची पुतणी तथा पारस कोठारी यांची कन्या पूजा कोठारी बोकरिया हि कोठारी परिवारातील पहिलीच कन्या सी ए उत्तीर्ण झाल्याबद्दल कोठारी परिवारा मार्फत तिचा सन्मान करत सत्कार करण्यात आला. व तिला भावी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
जामखेडचे माजी सरपंच प्रतिष्ठीत व्यापारी सुनील कोठारी व सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची पुतणी तथा पारस कोठारी यांची कन्या पूजा कोठारी हिने सिए परिक्षा उत्तीर्ण करत आपली व कोठारी परिवाराची मान उंचावली. त्यामुळे कोठारी कुंटुबीयाच्या वतीने तिचा सन्मान करण्यात आला. सर्व परिवारातील सदस्यांनी तिचे कौतुक करत तिझा सन्मान सत्कार करत तीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसे पहाता पुजा हिचा सिए चा अभ्यास चालु असतानाच दि 31 जानेवारी २०२३ रोजी अहमदनगर येथील सी.ए. प्रतिकेश बोकरीया यांच्याशी विवाह झाला होता.
त्यामुळे तीच्या पुढे अनेक आव्हाने असताना देखील तिने हार न मानता संसाराचा गाढा ओढत पती सासु सासरे आणी सासरच्या कुंटुबाची सर्व नितीमुल्ये जपत आपले शिक्षण आणि अभ्यास सांभाळुन सि.ए. सारखी कठीण पदवी संपादन केली. आणि कोठारी घराण्यातील पहिली सि.ए. कन्या होण्याचे भाग्य मिळवले.
मी केवळ माझ्या दोन्ही परिवारा मुळे हे यश मिळवु शकले कारण माझी आजी, आजोबा ,आई, वडील यांनी सर्वांनी धीर देऊन मला खूप प्रोत्साहन दिले त्यामध्ये माझे सासरे प्रशांत बोकरीया ,माझे पती प्रतिकेश ,सासुबाई यांनी सुद्धा मला प्रोत्साहन दिले त्यामुळे मी सी ए होऊ शकले असल्याचे यावेळी पुजाने सांगितले.
या वेळी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, श्रीमती शांताबाई कोठारी, माजी सरपंच सुनील कोठारी,सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी,पारस कोठारी, पुजाचे पती सी. ए. प्रतिकेश बोकरिया,संदेश कोठारी,संकेत कोठारी, सार्थक कोठारी, सौ सुनीता कोठारी, सौ श्वेता कोठारी, आरती कोठारी, मित्तल बोकरीया आदी उपस्थित होते.