हाळगाव येथील शेततळ्यात आई व दोन बालकांचे सापडले मृतदेह

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : 
जामखेड तालुक्यातील हाळगाव येथे एका महिलेसह तिच्या दोन बालकांचे मृतदेह आढळून आले असून हे मृतदेह एका शेततळ्यात तरंगताना आढळून आले आहेत. सदर महिला व मुले दि. १० जुलै पासुन बेपत्ता होती. तर दि. १२ जुलै रोजी हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

सविस्तर असे की, जामखेड पोलीस स्टेशन हद्दीतील हाळगाव येथील पोलीस पाटील सुरेश यशवंत ढवळे यांनी जामखेड पोलीस स्टेशनला माहिती दिली की, हाळगाव येथील शेतकरी भीमराव माहदू पिंपळे रा. हळगाव यांच्या गट नंबर ४३४ मधील शेतातील शेततळ्यामध्ये दोन स्त्रि जातीचे व एक पुरुष जातीचे असे एकूण तीन मृतदेह पाण्यामध्ये तरंगत आहेत. व प्रेते ही हळगाव गावातील असून त्यातील चांदणी उर्फ उमा बबन पाचरणे (वय ३१) दिपाली बबन पाचारणे (वय ११) व राजवीर बबन पाचारने वय (८ वर्ष) अशी त्यांची नावे आहेत. मिळालेल्या खबरीवरून जामखेड पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यू रजिस्टर 41/2023 crpc174 प्रमाणे दाखल केली व यानंतर पोलीस निरीक्षक महेश पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे व पोलीस स्टाफ घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहचल्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने सदर प्रेतांना शेततळ्यातून शेत तलावाच्या बाहेर काढले. व दोन वैद्यकीय अधिकारी यांना बोलावून त्या मृतदेहांचे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. 
  सदर महिला व मुले दि. १० जुलै रोजी सायंकाळ पासूनच बेपत्ता होती. त्याबाबत दि. ११ जामखेड पोलीस स्टेशनला तक्रार नोंद करण्यात आली होती व काल दि. १२ रोजी त्यांची प्रेते मिळाली आहेत. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे करीत आहेत. 


सदर घटनेतील मृतदेहांचे शवविच्छेदन अहवाल प्राप्त करून प्रस्तुत प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करीत आहेत. 

पोलीस निरीक्षक महेश पाटील

Post a Comment

Previous Post Next Post