चांद्रयान मोहिमेत नगर जिल्ह्यातील मयुरेश शेटे व असिफ महालदार सहभागी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
शुक्रवारी (दि 14) भारताच्या तिसऱ्या चांद्रयान मोहिमेची यशस्वी सुरुवात झाली आहे. या मोहिमेत अहमदनगर जिल्ह्यातील दोन जण सहभागी झाले आहेत. अहमदनगर येथील इस्त्रोचे वैज्ञानिक मयुरेश शेटे व राजुरीचे (ता.राहाता) सुरक्षा यंत्रणेतील असिफ महालदार हे सहभागी झाले आहेत. 

चांद्रयान-३ चं प्रक्षेपण शुक्रवारी झाल असून 
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोसाठी हा महत्त्वाचा दिवस ठरला आहे. चार वर्षानंतर इस्रोची पुन्हा एकदा महत्त्वाकांक्षी चंद्र मोहीम यशस्वी झाली आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून लाँच व्हेईकल मार्क-३ (LVM-३) रॉकेटद्वारे चांद्रयान-३ प्रक्षेपित करण्यात आले.
चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा भारताचा हा दुसरा प्रयत्न असेल. ही चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्यास चंद्रावर पाऊल ठेवणारा भारत चौथा देश ठरणार आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post