लिलाचंद मंडलेचा यांचे निधन, विखे पाटील फाउंडेशनकडे देहदान

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
जामखेड तालुक्यातील जवळा लिलाचंद तिलोकचंद मंडलेचा ( वय ८२) यांचे निधन झाले.लिलाचंद मंडलेचा यांचेमागे पत्नी, दोन मुले, मुलगी, सूना व नातवंडे असा परिवार आहे. मृत्युपुर्वीच त्यांनी केलेल्या इच्छेनूसार देहदान संकल्प पुर्ण करण्यात आला.

     जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन आणि जामखेडच्या कोठारी प्रतिष्ठाणकडे १८ नोव्हेंबर २०१८ रोजी लिलाचंद मंडलेचा यांनी पत्नी वृंदाकवरसह सपत्नीक देहदान फॉर्म भरला होता. 
दरम्यान रविवारी (ता.१६) लिलाचंद मंडलेचा यांचे निधन झाले. त्यांचा मृतदेह करमाळा येथील बायपास रोड शाहुनगर, दिपक लीलाचंद मंडलेचा यांच्या निवासस्थानी दुपारी २ वाजेपर्यंत अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आला.

      यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी , श्रेणिक खाटेर,अतुल राठोड, विकी मंडलेचा, प्रदीप मंडलेचा, प्रवीण मंडलेचा, प्रवीण छाजेड, प्रफुल्ल सोळंकी ,संपतलाल बोरा, शुभम बोरा, नंदलाल बोरा,सुमित चानोदिया, आदित्य मंडलेचा, विजय मंडलेचा, सुभाष मंडलेचा, उत्तम मंडलेचा, दिलीप मंडलेचा ,गौतम मंंडलेचा अतुल मंडलेचा,शांतीलाल संकलेचा निलेश खाबिया अमित छाजेड निलेश संचेती लीलाचंद बोरा, सुभाष बाफना ,राजमल खिंवासरा दर्शन सुराणा आनंद नाहर अशोक बाफना महेश राठोड संतोष ललवाणी राजेश छाजेड सुनील डूगरवाल 
यांच्यासह उपस्थित होते.

टाळ मृदुंगाच्या गजरात त्यांच मृतदेह
 अहमदनगर येथील डॉ विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन मेडिकल कॉलेजचे शरीर रचना शास्त्र विभाग प्रमुख डॉ सुधीर पवार यांच्या सहकार्याने आणि बाळासाहेब चव्हाण, गणेश पवार, संजय निकाळजे यांच्याकडे मृतदेह सुपूर्द करण्यात आला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले जैन कॉन्फरन्स आणि कोठारी प्रतिष्ठान मार्फत आम्ही देहदान संकल्प अभियान राबवत आहोत यामध्ये आत्तापर्यंत ४७७ लोकांनी फॉर्म भरलेले असून १२निधन झाले असून त्यांचे देहदान विखे पाटील फाउंडेशन मेडिकल कॉलेज अहमदनगर यांच्याकडे सुपूर्द केले आहे


Post a Comment

Previous Post Next Post