आ. रोहित पवार यांच्या पुण्यातील सृजन हाऊस,कार्यालयावर अज्ञातांनी केला हल्ला

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
      आमदार रोहित दादा पवार यांच्या पुण्यातील सृजन हाऊस, हडपसर या कार्यालयावर २-३ अज्ञातांनी शनिवारी पांढऱ्या रंगाच्या चारचाकीमध्ये येऊन मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास हल्ला करून कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसून कार्यालयात खाली असलेल्या काही वस्तूंचे खाली उभे असलेल्या वाहनाचे नुकसान झाले आहे. 

      यया संदर्भात स्वतः आमदार रोहित दादा पवार यांनी तक्रार दाखल केली असून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवळच असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस गुन्हेगारांचा तपास करत आहेत.


आमदार रोहित पवार यांचे पुणे येथील सर्व कामकाज
सृजन हाऊस, हडपसर या कार्यालयातून चालते अज्ञात गुन्हेगारांनी हे कार्यालय उध्वस्त करण्याचा किंवा जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचा या घटनेमुळे संशय निर्माण होत आहे



Post a Comment

Previous Post Next Post