सिताराम गड येथे हरिनाम सप्ताह प्रारंभ


जामखेड प्रतिनिधी
 सिद्ध संत सद्गुरू सिताराम बाबा यांच्या नवव्या पुण्यतिथी निमित्त तसेच श्री चतुर्भुज विष्णू मूर्ती श्री सद्गुरू सिताराम बाबा मूर्ती व सुवर्ण कलश श्रीक्षेत्र सिताराम गड खर्डा येथे अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद् भागवत कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गडाचे मठाधिपती ह भ प श्री महालिंग महाराज नगरे यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य उत्सवाची सुरुवात झाली आहे. 

मंगळवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी महंत महालिंग महाराज यांच्या हस्ते कलश व देवता पूजन करण्यात आले.  ह भ प हरिभाऊ महाराज गीते यांच्या हस्ते विना पूजन करण्यात आले. तसेच ह भ प संपत महाराज जायभाय व ह भ प राजू महाराज पुजारी यांच्या हस्ते ग्रंथ पूजन करून ह भ प श्री रघुनाथ अण्णा गपाट यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. व या भव्य उत्सवास प्रारंभ झाला.

 या उत्सवामध्ये पहाटे चार ते सहा काकडा भजन, सकाळी सात वाजता आरती, साडेसात ते नऊ ज्ञानेश्वरी पारायण, 10 ते 12 कीर्तन, 12 ते 1 गाथा भजन, दुपारी दोन ते पाच श्रीमद् भागवत कथा, सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ, रात्री नऊ ते 11 हरिकीर्तन व 11 ते पहाटे चार हरीजागर असे सात दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचे कार्यक्रम सुरू राहणार आहेत. 

मंगळवारी सकाळी 10 ते 12 ह भ प संपत महाराज जायभाय व रात्री नऊ ते 11 ह भ प उल्हास महाराज सूर्यवंशी आळंदी यांचे किर्तन झाले. बुधवारी सकाळी ह भ प हरिभाऊ महाराज गीते व सायंकाळी सोपान महाराज सानप शास्त्री परळी यांचे कीर्तन झाले. 

आज गुरुवारी सकाळी अण्णासाहेब महाराज बोधले डिकसळ ह भ प चैतन्य महाराज देहूकर पंढरपूर यांचे कीर्तन होईल. 
शुक्रवारी ह भ प समाधान महाराज शर्मा, शनिवारी सकाळी ह भ प अजिनाथ महाराज शास्त्री तारकेश्वर, सायंकाळी ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर, रविवारी ह भ प ज्ञानेश्वर माऊली नगरे, सायंकाळी माऊली महाराज पठाडे यांची कीर्तने होतील. सोमवारी दि. 18 सप्टेंबर रोजी सिताराम बाबा यांच्या प्रतिमेची टाळ मृदंगाच्या गजरामध्ये ग्रामप्रदक्षिणा मिरवणूक होईल व सायंकाळी 9 ते 11 ह भ प जयवंत महाराज बोधले पंढरपूर यांचे कीर्तन होईल व मंगळवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी सिताराम गडाचे मठाधिपती ह भ प महंत महालिंग महाराज सितारामगडकर यांचे काल्याचे किर्तन होईल व बाबांच्या समाधीवर पुष्पवृष्टी नंतर आरती होइल. व महाप्रसादाने या संपूर्ण उत्सवाची सांगता होईल तरी या संपूर्ण कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भक्तांनी लाभ घ्यावा असे सिताराम गडाचे वतीने आवाहन करण्यात आले आहे

Post a Comment

Previous Post Next Post