लेफ्टनंट प्रवीण भिवा हजारे यांची भारतीय सैन्य दलातील सेवा इतरांना प्रेरणादायी.- कॅप्टन भानुदास शिरसाठ


जामखेड प्रतिनिधी 
जवळा गावचे सुपुत्र ऑनररी लेफ्टनंट प्रवीण भिवा हजारे यांनी भारतीय सैन्य दलात निष्ठापुर्वक केलेली सेवा सैनिकांसाठी नेहमीच आदर्श आणि प्रेरणादायी राहणार असल्याचे गौरोदगार सेनामेडल प्राप्त सेवानिवृत्त कॅप्टन भानुदास शिरसाठ यांनी काढले.

जामखेड तालुक्यातील जवळा येथील प्रवीण भिवा हजारे हे भारतीय सैन्य दलाच्या २८ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर ऑनररी लेफ्टनंट या सैन्य दलातील उच्च पदावरून सेवानिवृत्त झाले. यानिमित्त जवळा येथे नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले.यावेळी कॅप्टन शिरसाठ बोलत होते.सेवानिवृत्त जेष्ठ सैनिक खंडु कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास शिवाजी मेहेर, त्रिदल संघटनेचे तालुकाध्यक्ष कॅप्टन लक्ष्मण भोरे, ज्योती क्रांती मल्टीटेटचे अध्यक्ष आजीनाथ हजारे, उपाध्यक्ष दशरथ हजारे, सरपंच प्रशांत शिंदे, उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर, प्रदिप दळवी,प्रशांत पाटील, माजी सभापती सुभाष आव्हाड, गौतम कोल्हे , संजय आव्हाड, राहूल पाटील, उमेश रोडे , सैनिक सुदाम हजारे , सेवानिवृत्त सैनिक सोमनाथ वाळुंजकर, कानिफ पठाडे, सोमनाथ लेकुरवाळे, अहमद शेख, प्रवीण मेहेर , संतोष सरसमकर सर , डाॅ.ईश्वर हजारे यांच्यासह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

प्रारंभी लेफ्टनंट प्रवीण हजारे यांची जवळा गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.त्यामध्ये मोठ्या संख्येने महिलांसह लोक सहभागी झाले. मिरवणूकीत हजारे यांचे ठिकठिकाणी औंक्षण करण्यात आले. संत सावतामाळी मंदिर प्रांगणात झालेल्या नागरी सत्कार सोहळयात मान्यवरांबरोबरच अनेक संघटनाच्या पदाधिका-यांच्या वतीने प्रवीण हजारे यांच्यासह आईवडीलांचा सत्कार करण्यात आला.

३० वर्षानंतरही तोच जिव्हाळा
——————————————
प्रवीण हजारे हे सन १९९३ च्या इयत्ता दहावी बॅचचे विद्यार्थी. आज ३० वर्षानंतर आपला वर्गमित्र सैन्यदलात उत्तम सेवा बजावून उच्च पदावरून सेवानिवृत्त होत असल्याचा आनंद या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी घेतला. नागरी सत्कार सोहळयास १९९३ बॅचचे तब्बल ७० हून अधिक माजी विद्यार्थी,विद्यार्थींनींनी सहभाग घेतला. डोक्याला भगवा फेट्या बांधून संपुर्ण कार्यक्रमात सहभागी झालेल्या या माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची वेगळीच शोभा वाढवली. ३० वर्षानंतरही वर्गमित्राबद्दलचा जिव्हाळा गावात चर्चेचा विषय राहिला.


Post a Comment

Previous Post Next Post