जामखेड प्रतिनिधी
भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांचे शनिवारी जामखेड तालुक्यात आगमन होणार असून जामखेड शहरातील खर्डा चौकामध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या वतीने भव्य सत्कार करण्यात येणार आहे.
भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांची ४ सप्टेंबर रोजी निघालेली शिवशक्ती परिक्रमा यात्रा उद्या दि. ९ रोजी जामखेड तालुक्यातील खर्डा येथे येणार आहे जामखेड शहरातील खर्डा चौक येथे सकाळी पावणे बारा च्या सुमारास पंकजाताईंचे आगमन होईल तेथे लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या वतीने त्यांचे भव्य स्वागत होईल त्यानंतर खर्ड्याकडे जाताना राजुरी ते खर्डा मोटार सायकल रॅली तून त्या खर्डा येथे पोहोचतील खर्डा भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची भव्य तयारी करण्यात आली असून पंचक्रोशीतील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थिती राहावे असे अवाहन भाजपा युवक नेते बाजीराव गोपाळघरे यांनी केले आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे. पंकजा मुंडे या यात्रेच्या माध्यमातून आठ दिवस राज्यातील अनेक जिल्हे पिंजून काढणार आहेत . विविध धार्मिकस्थळे आणि शक्तीपिठांना भेट देणार आहेत. जनतेशी संवादही साधणार आहेत. त्यांच्या या यात्रेने भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी काढलेल्या यात्रेची आठवणही केली जात आहे. पंकजा मुंडे यांच्या या शिवशक्ती परिक्रमा यात्रे दरम्यान जामखेड रोडवरील लोणी फाटा ते खर्डा मोटारसायकल रॅली निघणार असून ही रॅली खर्डा येथील सिताराम गडावर येईल. सिताराम गड ते खर्डा बसस्थानक अशी कार्यकर्ते व नागरिकांची भव्य रॅली निघणार आहे खर्डा बसस्थानक येथे पंकजाताईचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. व खर्डा बसस्थानकावर निर्माण करण्यात आलेल्या गोपीनाथ मुंडे प्रवेशद्वाराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचे गितेबाबा समाधीकडे प्रस्थान होईल तेथे सार्वजनिक सत्कार कार्यक्रम व मार्गदर्शन व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व कार्यक्रमांसाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.