जामखेड शहरातील दुर्गामाता मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त दर्शनासाठी गर्दी


महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
जामखेड शहराच्या मध्यवर्ती असलेले बुरुडगल्ली  बाजार तळ येथील दुर्गामाता देवी मंदिर हे एक शहरातील भक्तांचे श्रद्धास्थान आहे. गेल्या अनेक वर्षापासून येथे नवरात्र उत्सव साजरा केला जातो. यावर्षी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मंदिरात घटस्थापना करण्यात आली आहे. त्याचबरोबर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे येथे दिवसभर भक्तांची गर्दी पाहायला मिळते. यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक असते. मंदिराच्या विकास कामासाठी ट्रस्टच्या वतीने येथे येथे भव्य लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आलेले आहे. 

    जामखेड शहरातील बाजारतळ येथील दुर्गामाता मंदिर ट्रस्ट च्या वतीने नवरात्र उत्सवा निमित्त मंदिर परिसर स्वच्छ करून देवीची विधिवत पूजा करण्यात आली व घटस्थापना करण्यात आली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने सर व त्यांच्या पत्नी सौ.वर्षाताई माने यांच्या हस्ते महाआरती आली.

          यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष दत्ता पवार, शिवसेना शहरप्रमुख देविदास भादलकर ,युवा नेते राजू पवार, अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख मुस्तफा शेख मेजर,पांडुरंग समुद्र,रवि वडे,अमोल मोरे,महेश कटारिया,आशुतोष बिडकर ,केतन वडतीले,सचिन पवार , बालाजी मोरे, आण्णा मोरे,जोशी देवा आदी माहिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    जामखेड शहराच्या मध्यवर्ती असलेल्या दुर्गादेवी मंदिराचे गाभारा व सभामंडप असे दोन भाग आहेत पूर्वमुखी असलेल्या या मंदिरामध्ये दुर्गादेवीची सुंदर मूर्ती आहे. त्याचबरोबर मूर्तीच्या शेजारी नवरात्र उत्सवासाठी लागणारी उत्सव मूर्ती वर्षभर ठेवलेली असते. तसेच गाभाऱ्यात गणपतीची  उत्सव मूर्ती वर्षभर ठेवलेली असते. मंदिराच्या मागच्या बाजूला महादेव मंदिर आहे. समोर यज्ञकुंड आहे. या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी वर्षभर भक्त येत असतात. विशेष करून नवरात्र उत्सवात दहा दिवस येथे विविध धार्मिक कार्यक्रम ठेवले जातात.दररोज सकाळी महापूजा, सकाळी व सायंकाळी दररोज विशेष यजमानांच्या हस्ते आरती करण्यात येते. येथे आराध्याच्या गाण्याचा दहा दिवस अखंड कार्यक्रम सुरू असतो. त्याचबरोबर यावर्षी वारकरी सांप्रदायिक भजनाचे ही आयोजन करण्यात आले आहे. एकूणच येथे भक्तिमय वातावरण आहे. तसेच संगीत खुर्ची सारख्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. 

     मंदिराच्या विकासासाठी ट्रस्टच्या वतीने यावर्षी लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पाचशे एक रुपया मध्ये आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये दोन स्कूटर एक फ्रिज सह इतर छोटे बक्षीसचा समावेश आहे. आपले भविष्य आजमावण्यासाठी येथे लकी ड्रॉ चे तिकीट घेण्यासाठी आवर्जून लोक येत आहेत. हे लकी ड्रॉ चे तिकीट शहरातील जास्तीत जास्त लोकांनी घ्यावे असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. या लकी ड्रॉ ची सोडत पौर्णिमेच्या दिवशी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post