महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
दिनांक ५ ते ८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत नोएडा, उत्तर प्रदेश येथे २ री ओपन नॅशनल तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२३ संपन्न झाली. या स्पर्धेत अहमदनगर येथील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवत 6 सुवर्ण 3 रौप्य व 3 कास्य पदके पटकावले आहेत.
या स्पर्धेमध्ये सुमारे २२०० खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धा क्योरिगी आणि पूमसे अशा दोन्ही प्रकारात खेळल्या गेल्या. महाराष्ट्रच्या संघाने या स्पर्धेत घवघवीत यश मिळून सर्वसाधारण उपविजेतेपद व सब जुनिअर गटाचेही उप विजेतेपद मिळवले.
सबजुनियर गटात नगरच्या अनन्या रणसिंग, वैष्णवी बेरड , प्रियांका मिसाळ, श्रावणी रणसिंग,सृष्टी चौधरी, ईश्वरी रोडे या सहा खेळाडूंनी सुवर्ण पदके तर सिद्धांत त्रिपाठी,अवधूत खरमाटे,यश नगरकर या तिघांनी रौप्य पदके जिंकली तर सलोनी प्रसाद,साईश टाकूर,आयुष भुजबळ या तिघांनी कास्य पदके जिंकली. या राष्ट्रीय स्पर्धेत, श्री महेश टेमक, श्री रवी यादव श्री.गणेश धिवर,अक्षय साळुंके,धनश्री कांडीवकर, प्रिती सिंग, विशाल जंजाळ,यांनी मार्गदर्शन केले.
या सर्व खेळाडूंचे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र , मुंबईचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, राज्य शासनाचे क्रीडा मार्गदर्शक श्री प्रविण बोरसे सर अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. एकनाथ मुंढे, सचिव श्री. संतोष बारगजे, सहसचिव अल्ताप कडकले, श्री.संजय शिंदे,शकील सय्यद,सुरेश वाघ, सुरज शिंदे, अक्षय चंदन, अमोल जऱ्हाड, अविनाश गुंजाळ, यांनी अभिनंदन केले आहे.