जामखेड प्रतिनिधी
मुंबईहून बीड कडे जाणारी सागर ट्रॅव्हल्स जामखेड जवळ असलेल्या आष्टा फाट्यावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण गेल्यामुळे बस उलटली व 150 ते 200 मीटर ही बस रस्त्याने घसरत गेली. बस घसरत असताना बऱ्याच जणांनी बाहेर उड्या टाकण्याचा प्रयत्न केल्यामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले. तर 5 जणांचा मृत्यू झाला.
आज गुरुवार दि 26 ऑक्टोबर 2023 रोजी पहाटे सहाच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर आमदार सुरेश धस यांचे स्वीय सहाय्यक दत्ता हुले यांचा जामखेडचे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना फोन आल्यानंतर त्यांनी तात्काळ आपली ॲम्बुलन्स घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांनी इतर अनेक ऍम्ब्युलन्सलाही फोन लावले. अपघाताची भीषणता सांगत असताना संजय कोठारी म्हणाले की "घटनास्थळी मी सर्वात आधी पोहोचलो होतो. त्यानंतर आमदार सुरेश आण्णा धस हे देखील लगेच पोहोचले. बस उलटून साधारण दीडशे मीटर रस्त्याने घसरत गेली होती. आम्ही मदत कार्य सुरू करत असताना एका लहान मुलाचा हात तुटून रस्त्यावर पडल्याचे माझ्या लक्षात आल्यानंतर मी तो तुटलेला हात उचलून गाडीत ठेवला. त्याला जामखेडला आणण्यात आले. तेथून परत त्याचा तुटलेला हात व तो मुलगा नगरच्या खाजगी रुग्णालयाकडे रवाना झाला. सकाळी आम्ही घटनास्थळी असताना दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर दहा ते बारा जण गंभीर जखमी होते त्यांना आष्टीला व काहींना नगरला हलवण्यात आले होते. असे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले.
या बाबत अधिक माहिती अशी की काल रात्री मंबईहुन बीडकडे एन. एल. ०१ बी. २४९९ या क्रमांकाची खाजगी बस प्रवासी घेऊन निघाली होती. या बस मध्ये सुमारे ४० प्रवासी प्रवास करत होते. ही बस आज २६ ऑक्टोबर रोजी पहाटे सहाच्या सुमारास जामखेडच्या सरहद्दीपासून अगदी जवळच आष्टी तालुक्यातील चिंचपूर जवळ उलटली.
या आपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. उपचारात जबादरम्यान व उपचारासाठी जाताना आणखी तीन जणांचा मृत्यू झाला.
यामध्ये १) धोंडीबा यशवंत शिंदे वय ३६ रा. भिल्लारवाडी पो.जाटनांदूर ता. शिरूर जि. बीड, २) देविदास दत्तू पेचे रा. सौताडा ता. पाटोदा जि.बीड ३) अशोक महादेव भोंडवे पिट्टी नायगाव ता. पाटोदा जि. बीड ४) महमद आसिफ दोस्त महमद खान रा. कुर्ला मुंबई पश्चिम ५) रवी यादव गोंडवे (वय २८) मोतीनगर डीग्रस ता. पुसद जि. यवतमाळ या पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दहा ते बारा जण गंभीर जखमी तर पंचवीस ते तीस जण कीरकोळ जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने रुग्णसेवा मिळावी यासाठी संजय कोठारी यांनी स्वतःच्या ॲम्बुलन्स मध्ये अनेक रुग्णांना रुग्णालयात पोहोचविले व इतरांच्या मदतीने ही सर्व रुग्णांना योग्य स्थळी पोहोचविण्यात त्यांना यश आले. त्यामुळे या दुर्घटनेमध्ये अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकले. मुळातच या भीषण अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला परंतु जखमी रुग्णांना वेळेत मदतकार्य झाले नसते तर आणखीन अर्थ झाला असता.
या अपघातात मदत कार्यात सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, यांच्या समावेत आ. सुरेश धस यांनीही जखमी रुग्णांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी मोलाचे सहकार्य केले त्याचबरोबर जामखेडचे रमेश आजबे, माजी सरपंच सुनिल कोठारी, संदेश कोठारी, आमोल गिरमे, गणेश डोंगरे, चिंचपूर चे सरपंच ढवळे मेजर, हरीणारायण आष्टा येथिल सरपंच पठाडे, जामखेड चे वसीम सय्यद, संजय नहार,गणेश बांदल, प्रविण उगले, आ. रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक विनय डुकरे, गुलाब पटेल युवा मंच चिंचपुर देवाचे, दीपक भोरे, विशाल ढवळे, अशोक टेकाळे तात्या राक्षे
यांनी देखील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. घटनास्थळी तातडीने पंधरा रुग्णवाहिका व दोन जेसीबी पाचारण करण्यात आल्या होत्या. जेसीबी च्या सहाय्याने रस्त्यावर आडवी पडलेली खाजगी बस बाजुला घेण्यात आली व नंतर वाहातुक सुरळीत करण्यात आली.
चौकट
यावेळी आमदार सुरेश धस म्हणाले संजय शेठ कोठारी हे नेहमीच सर्वच अगोदर पोहोचतात खरच त्यांचे कौतुक केले पाहिजे