गटशिक्षणाधिकारी श्री. बाळासाहेब धनवे यांच्या प्रयत्नातून शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी मंजूर - श्री. नारायण राऊत

जामखेड - जामखेड तालुक्याचे भूमिपुत्र व कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी श्री. बाळासाहेब धनवे यांनी केलेले प्रयत्न व पाठपुरावा या मुळेच जिल्हा परिषद शाळेतील ४२ शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर झाली असून ऐन दिवाळीत प्रास्ताव मंजूर करण्यात आल्याने सर्व शिक्षकांत आनंदाचे वातावरण आहे . याचे सर्व श्रेय बाळासाहेब धनवे व त्यांच्या सहकाऱ्यांना  असल्याचे प्रतिपादन जामखेड तालुका सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष व शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष श्री. नारायण राऊत यांनी केले आहे .

            धनवे यांनी यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून कार्यालयीन कर्मचारी यांचे कडून काम करून घेतले .वेळ प्रसंगी त्यांना नोटीसाही दिल्या . श्री. गांगर्डे , श्री. नरवणे यांनी चांगली मेहनत घेतली .                         
     बाळासाहेब धनवे हे जामखेड तालुक्यात हजर झाल्यापासून शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. शिक्षकांच्या अनेक वर्षापासूनचे वैद्यकीय बीले त्वरीत काढण्यात आली . शिक्षकाच्या रजा , गटविमा प्रकरणे , भविष्य निर्वाह निधी प्रकरणे , पेन्शन प्रकरण , आदि . शिक्षकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न त्यांनी  सोडविले आहेत .                                         
      बाळासाहेब धनवे हे तालुक्यात  फिरून शाळाभेटी करत आहेत , कोणत्याच शिक्षकांवर कारवाई न करता शिक्षकांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या चांगल्या कामाचे कौतूक करून प्रसिद्धी देत आहेत . त्यामुळे शिक्षक वर्ग आधिक जोमाने काम करत असून तालूक्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढली आहे . ग्रामस्थ , पदाधिकारी ,समाज यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांबाबत चांगला मेसेज गेला आहे .असे नारायण राऊत यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post