जामखेड येथे ७ जानेवारीला होणार ; भव्य राज्यस्तरीय मॅरेथॉन, नियोजनाची बैठक संपन्न


जामखेड प्रतिनिधी
स्व. विष्णू वस्ताद काशिद यांच्या प्रेरणेने, अहमदनगर जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने व मल्लविद्या संस्कार कुस्ती फाऊंडेशनच्या वतीने देशातील युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त जामखेड येथे  दि. ७ जानेवारी रोजी भव्य राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन (वर्ष 4 थे) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 


या स्पर्धेत संपुर्ण महाराष्ट्रातून स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थिती राहावे राहाणार आहेत. अशी माहिती स्पर्धेचे आयोजक व मल्लविद्या संस्कार कुस्ती फाऊंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष तसेच उपमहाराष्ट्र केसरी, इंदौर केसरी पै. बबनकाका काशिद यांनी दिली आहे. 


   जामखेड येथिल शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली या बैठकीसाठी जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, शिवनेरी अकॅडमीचे संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे, शशिकांत सुतार  (सा बा विभाग उपअभियंता जामखेड), शंकर शिंदे, पै निरंजन नखाते, आण्णा मोहिते ( क्रीडा प्रमुख जामखेड महाविद्यालय) , मयुर भोसले (एनसीसी ऑफिसर) , खंडेराव सोळंके, धीरज पाटील, सुग्रीव ठाकरे, विलास पवार व सर्व क्रीडाप्रेमी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्पर्धेच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. 

      दि. ७ जानेवारी २०१३ रोजी ठिक या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन  क्रीडा क्षेत्रातील मान्यवर आजी माजी खेळाडु व पंच कमिटी यांच्या उपस्थतीत संपन्न होणाऱ्या या 
स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने उपस्थिती राहावे असे आवाहन 
 मल्लविद्या संस्कार कुस्ती फाऊंडेशन जामखेडचे संस्थापक, अध्यक्ष पै. बबनकाका सा. काशिद यांनी केले आहे. स्पर्धेविषयी आवश्यक माहिती 
    या स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी आकारण्यात येणार नाही.
स्पर्धेचे गट
 हाफ मॅरेथॉन २१ किलोमीटर
 पुरुष गट खुला
महिला गट - खुला - ११  किलोमीटर

कुमार गट - 5 कि मी
सोळा वर्षाखालील -मुले 
सोळा वर्षाखालील -मुली
(टिप- कुमार/कुमारी गटाची जन्म दिनांक 7 जानेवारी 2008 नंतरचे स्पर्धक पात्र ठरतील)

वरिष्ठ गट- पुरुष  4 कि मी 
50 वर्षांपुढील सर्व पुरुष 
वरिष्ठ गट- महिला 4 कि मी 
 35 वर्षांपुढील सर्व महिला

रोख रक्कम ,सन्मान चिन्ह मेडल प्रशस्तीपत्र
असे बक्षीसाचे स्वरूप आहे. तसेच मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
07जानेवारी 2024 सकाळी 6 वा खर्डा चौक(उर्दु शाळा जवळ) जामखेड येथे स्पर्धेची सुरवात होईल 
 
 संपर्क नंबर.
 श्री हनुमंत जाधव( संस्थेचे सचिव) 9403911919
श्री किशोर सातपुते 9850242076
श्री मयूर भोसले 9552755205 
आयोजक - मा उपमहाराष्ट्र केसरी बबन काका काशीद 9922756788 
  सर्व स्पर्धकांनी  या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आयोजकाच्या वतीने आव्हान करण्यात आले.

1 Comments

Previous Post Next Post