लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न..!

*लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न..!*

जालना येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाजातील एमबीबीएस, आयआयटी,युपीएससी,  एमपीएससी इत्यादी स्पर्धा परीक्षेत गुणवंत ठरलेल्या 45 विद्यार्थी व पालकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता.
https://youtu.be/rGZ0LsaeprY?si=1fDqFESJepDnafqF
(संपूर्ण व्हिडिओ लिंक )

कार्यक्रमात सर्वप्रथम लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या अर्धाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. तदनंतर साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. काही मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर, भाजप नेते भास्करआबा दानवे, काँग्रेसचे युवा नेते अक्षयभैय्या गोरंट्याल, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, भाजप नेते राजेश राऊत, जिल्हा परिषदचे माजी सभापती भानुदासनाना घुगे, सर्जन डॉ. श्रीमंत मिसाळ, मनसे जिल्हाप्रमुख गजानन गीते, रा स प नेते नारायण दादा चाळगे, भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर, सिनेट सदस्य प्रा.भगवानसिंग डोभाळ, मा.पं.स. ब्रह्माजी वाघ, जालिंदर डोईफोडे, शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष दीपक दराडे, नगरसेवक गणेश घुगे, नगरसेवक कैलास देठे, नगरसेवक अकोलकर, डॉ.रामदास सांगळे, डॉ. प्रवीण चाटे, प्रा.थोरवे सर इ. उपस्थित होते. जयंती निमित्त झालेल्या कार्यक्रमासाठी जवळपास 200 लोक उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे विचार मंच वंजारी सेवा संघ जालना यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला. वंजारी सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष देवेंद्र बारगजे, वंजारी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप हुसे, जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब गीते, जगतदादा घुगे, भाजप युवा नेते सुहास मुंडे, वंजारी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश जायभाये, प्राध्यापक ज्ञानेश्वर नागरे, योगेश नागरे, ओमप्रभु नागरे, संदीप चाटे, रमेश घुगे, उमेश सानप, वैभव मुंडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
     कार्यक्रमासाठी ज्या सर्वांनी आर्थिक मदत केली मदत केली. तसेच आमच्या विनंतीला मान देऊन व मुंडे साहेबांप्रती आस्था व प्रेम असणारे समाज बांधव या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार..!

Post a Comment

Previous Post Next Post