पिंपरखेड जिल्हा परिषद शाळेत कलाविष्कार महोत्सव उत्साहात साजरा,शाळेला मिळाला 90 हजार रुपयाचा लोकसहभाग


 
जामखेड प्रतिनिधी 
 जामखेड तालुक्यातील पिंपरखेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन कलाविष्कार महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
 
तालुक्याचे गट शिक्षणाधिकरी मा.श्री. बाळासाहेब धनवे यांच्या प्रेरणेतून शाळेत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमास कर्जतचे तहसीलदार महादेव कारंडे, पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद साहेब, श्री सचिन चोरगे साहेब श्री विक्रम बडे साहेब तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व द्वीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी सय्यद साहेब ब कारंडे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
प्रसंगी जिल्हा स्तरीय शालेय खो खो स्पर्धेत उपविजेतेपद मिळवलेल्या संघाचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य नाटिका एकांकिका कव्वाली लावणी उखाणे कॉमेडी नाट्य असे विविध कलाप्रकार सादर केले. व प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

छोट्या चिमुरड्यानी सादर केलेल्या नृत्यातून प्रेक्षकांना आपल्या तालावर ठेका धरायला लावला.
चिमुकल्यांनी सादर केलेल्या पात्रावर सर्वांना मनमुराद हसायला लावले.
टाळ्यांच्या गजरात हा कार्यक्रम रंगत गेला.
प्रेक्षकांनी भरभरून कौतुक करत या लहानग्या मुलांवर बक्षिसांचा वर्षाव केला. 
संध्याकाळी सुरू झालेला हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालू राहिला तरी प्रेक्षकांनी अतिशय उत्कंठेने पहिला. या कार्यक्रमासाठी शिक्षक पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

या प्रसंगी तालुक्यातील अनेक शिक्षकांनी भेट देत कार्यक्रमाचा आस्वाद लुटला. या सर्व विद्यार्थ्यांना विस्तार अधिकारी सुनील जाधव साहेब व केंद्र प्रमुख बडे साहेब यांनी प्रोत्साहित केले.

या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाबासाहेब कदम, अविनाश चोरगे, अशोक जाधव, शाकीर शेख , बाबासाहेब ढवळे, रणजित म्हस्के, विशाल गाडेकर, सरपंच राजेंद्र ओमासे, अविनाश गायकवाड, बापूराव ढवळे ,करण ढवळे यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे यशविस्तेसाठी पिंपरखेड शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय भोसले सर, प्रवीण शिंदे सर, सुभाष सरोदे सर, रवींद्र इंगुले सर, अंगद कोथमिरे सर, भगवान साळुंखे सर, श्रीमती सुशीला जरे मॅडम यांनी कष्ट घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान साळुंखे सर व सुभाष सरोदे सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रवीण शिंदे सर यांनी केले.

या कार्यक्रमातून एकूण 90 हजार रुपये लोकसहभाग शाळेस प्राप्त झाला.
या कामगिरीबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे गट विकास अधिकारी प्रकाश पोळ साहेब गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे साहेब, खर्डा बीटचे विस्तार अधिकारी सुनील जाधव साहेब , केंद्र प्रमुख विक्रम बडे साहेब यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post