श्रीम.पार्वती विश्वनाथ इनामदार (ऊर्फ ताई)यांना वयाच्या ७५ व्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने अर्थात अमृतमहोत्सवी वर्षाच्या गौरवाप्रित्यर्थ सोमवार दि.11मार्च 2024 रोजी जि.प.प्रा.शाळा दत्तवाडी (धोंडपारगाव) येथे आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.त्यानिमित्त उत्साहमूर्ती ताईंच्या जीवनावर लिहिलेला हा लेख.....
'श्यामची आई' या पुस्तकाचा प्रभाव इनामदार कुटुंबांवर खूपच पडलेला दिसतो. लहानपणी 'श्यामची आई', या पुस्तकासाठी इनामदार सरांनी आपल्या वडिलांकडे केलेला हट्ट. व तो हट्ट पुरवण्यासाठी बापलेकाची झालेली 23 किलोमीटर पायपीट.
'श्यामची आई' या पुस्तकामध्ये एक प्रसंग आहे. सकाळची वेळ होती सूर्याची सोनेरी किरणे जमिनीवर पसरली होती. थंड हवा अंगाला झोंबत होती. अशावेळी श्यामची आई, श्यामला दारासमोर असलेल्या दगडावर आंघोळ घालत होती. आंघोळ झाल्यावर, श्याम पायाला माती लागू नये म्हणून काळजी घेत होता. हे आईने पाहिले. आणि त्या म्हणाल्या,'श्याम जसे पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तशीच मनाला सुद्धा घाण लागू देऊ नकोस.'
याचप्रमाणे श्रीमती पार्वतीबाई इनामदार यांनी मुलांना वाढवताना काळजी घेतल्याचे पदोपदी जाणवते.पतीच्या आजारपणात आर्थिक बाजू सांभाळताना त्यांची प्रचंड तारेवरील कसरत व्हायची.यावेळी मुलांच्यावर त्यांनी केलेले संस्कार कामी आले .
वडिलांच्या आजारपणात गुडघ्या एवढ्या लेकरांनी घर व शाळा सांभाळून, भुईमुगाच्या शेंगा फोडणे,कापूस वेचणे इ.हाती पडेल ती कामे केली व आर्थिक मदत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला ,परंतु त्या प्रयत्नांना यश आले नाही. वडिलांनी ऐन उमेदीच्या वयातच, या जगाचा निरोप घेतला. आणि तीन लेकरं पोरकी झाली.
अर्ध्या वयामध्ये पतीने घेतलेला जगाचा निरोप. हे दुःख पचवून पार्वतीबाई तीन लेकरांच्या पाठीमागे ठामपणे उभ्या राहिल्या.या लेकररांसाठी त्यांना मन धीट करून जगावं लागणार होतं. अत्यंत बिकट अवस्थेत त्यांनी मुलांची शिक्षणं व लग्न पार पाडली.
लहान वयात इनामदार सरांच्यावर खूप मोठ्या जबाबदाऱ्या पडल्या.शेती नाही,नातेवाईकांचा आधार नाही,एक झोपडीवजा साधे घर सोडता, कोणतीही वडिलोपार्जित संपत्ती नाही.अशा वेळी कुटुंबाला आर्थिक हातभार लावून शिक्षण घेताना त्यांच्या नाकी नऊ येत होते.म्हैसगावमध्ये त्यावेळी फक्त ७वी पर्यंत शाळा होती. पुढील शिक्षणासाठी मुले राहुरीला किंवा टाकळी ढोकेश्वरला होस्टेलवर जात होती.दोन्हीपैकी कोणत्याही ठिकाणी शिक्षणासाठी मुलाला पाठवणे शक्य होत नाही,असे लक्षात आल्यावर गावापासून तीन कि.मी.अंतरावरील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत इ.८वी ते १०वी पर्यंत मुलाला शिक्षण मिळावे यांसाठी ताईंनी तब्बल १५ दिवस अनेक लोकांना व तेथील शिक्षकांना विनवणी करून आश्रमशाळेतील वह्या,पुस्तके,जेवण,राहणे इ.कोणतीही सवलत नको,फक्त माझ्या मुलाला शिक्षणासाठी प्रवेश द्या. अशी विनवणी करून आश्रम शाळेत प्रवेश घेतला.जर ताईंनी त्यावेळी सरांच्या शिक्षणासाठी मध्येच प्रयत्न सोडले असते,तर कदाचित इनामदार सर सातवीनंतरच शाळाबाह्य झाले असते.
जीवनामध्ये उत्तम मार्गदर्शक असेल तर जीवनाचे सोने व्हायला वेळ लागत नाही.बारावीनंतर ताईंनी सरांना सांगितले की, 'तू आता डि.एडला ऍडमिशन घे. कारण असं किती दिवस जगायचं? जीवनामध्ये वेगळे काहीतरी करायचे असेल तर वेगळा विचार करावा लागेल.'सरांनी त्याप्रमाणे प्रयत्न केले.
डीएड चा फॉर्म भरण्यासाठी सर छत्रपती संभाजीनगरला गेले. फॉर्म भरण्यासाठी अनेक जणांचे आई-वडील, भाऊ, मित्र असे अनेकजण बरोबर आले होते .परंतु सरांच्या बरोबर कोणीही नव्हते.विशेष म्हणजे जाण्यापुरतीच काहीशी रक्कम बरोबर होती. डी.एड. चा फॉर्म त्यांनी व्यवस्थित भरला आणि परतीच्या प्रवासाला निघायचे तर खिशात एकही रूपया नाही. त्यादिवशी वटपौर्णिमा होती. चालत बस स्टॅन्डकडे जात असताना त्यांनी पाहिले की अनेक स्त्रिया वडाच्या झाडाचे पूजन करत आहेत पण तिथं पूजा करण्यासाठी ब्राह्मण नाही या संधीचा फायदा घेऊन त्यांनी दिवसभर येणाऱ्या स्त्रियांची पूजाअर्चा करून घेतली. त्यातून परतीच्या प्रवासाचा खर्च निघून तब्बल दहा रुपये त्यांना शिल्लक राहिले. असेच पंढरपूरला तनपुरे महाराजांच्या मठासमोर त्यांनी दोन दिवस केळी विकली होती.
अशा छोट्या छोट्या प्रसंगातून स्वतःला कसे निभावून न्यायचे संधीचे सोने कसे करायचे. कोणत्याही प्रसंगाला कसे सामोरे जायचे. हे ताईंनी केलेले मार्गदर्शन सरांसाठी खूप मोलाचे ठरले.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये सरांनी डी एड पूर्ण केले. जोपर्यंत नोकरी लागत नाही. तोपर्यंत परत त्यांनी गावातील लोकांचे अभिषेक,पारायण,पूजाअर्चा करणे ही कामे सुरू केली.
महालक्ष्मी पूजनाचा, अर्थात गौरीगणपतीचा सण होता. सगळीकडे उत्साह संचारला होता. महालक्ष्मीची आरती करण्याची वेळ जवळ येत होती. तेवढ्यात पोस्टमन ने आवाज दिला," नवनाथ आहे का घरात?" ताई म्हणाल्या,"तो बाहेर गेला आहे".असे म्हणताच, पोस्टमनने ताईंच्या हातात एक पाकीट काढून दिले. आणि म्हणाला," ताई,साखर आणा. नवनाथ शिक्षक झाला." हे वाक्य ऐकताच, ताईंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पोटच्या गोळ्याला शिक्षणासाठी करावा लागलेला संघर्ष डोळ्यासमोर तराळू लागला.
मनामध्ये निर्माण झालेली एक इच्छा. की ,आपल्यासारखी समाजामध्ये कित्येक मुलं शिक्षणापासून वंचित राहत असतील. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणायचे असेल तर साने गुरुजींच्या सारखे शिक्षक असणे गरजेचे आहे. त्यासाठी आपला मुलगा शिक्षक व्हावा ही मनात धरलेली इच्छा आज महालक्ष्मीपूजनाच्या, सणादिवशी पूर्ण झाली होती.
असे हे रामनामाचा ध्यास असलेले,दूरदृष्टी, संयमी, उत्साह मुर्ती, व्यक्तिमत्व.यांना आज दत्तवाडी शाळेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या 'लेक शिकवा' अभियानांतर्गत सन २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षाचा 'आदर्श माता', पुरस्कार देण्यात येत आहे. ही खरचं आनंदाची बाब आहे. अनेक मातांना आदर्श माता, हा पुरस्कार देऊन सन्मानित करणारे आदरणीय गुरुवर्य ह भ प मनोहर इनामदार सर..... परंतु त्यांच्या आईच्या हातून, संत साहित्याचा गाढा अभ्यास असणारे, एक आदर्श शिक्षक, किर्तनकार ,लेखक,संपादक, वक्ते व साधक असणारे हे बहुआयामी व्यक्तिमत्व घडवणाऱ्या श्रीमती पार्वती इनामदार यांना पुरस्कार प्रदान करावा हे ज्यांने हेरले असे आदरणीय श्री हरिदास पावणे सर ,सौ.शितल काळे मॅडम व या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे पालक. यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
ताईंबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे. आजही सकाळी लवकर उठून जामखेड मधील जवळपास सर्व मंदिरांमध्ये जाऊन तेथील देवी देवतांचे दर्शन त्या घेतात.सायंकाळचा हरिपाठ व चातुर्मासातील पहाटेचा काकडा हा त्यांचा नित्यक्रम. तो त्या कधीही चुकवत नाहीत.ताईच्या हातचा शिरा खाल्यानंतर कितीतरी वेळ जीभेवर ती चव रेंगाळत असते.अश्या या उत्तम पाककला अवगत असलेल्या ताई.
वय झाल्यानंतर लोकांचा उत्साह मावळताना दिसतो, परंतु ताईंच्या बाबतीत ते उलट घडताना दिसत आहे. अशिक्षित असताना मनामध्ये आपण पुस्तके वाचायला हवीत. हा विचार मनामध्ये येतो आणि पोटच्या मुलाकडून लिहा वाचायला शिकतात आणि अनेक ग्रंथांचा व पुस्तकांचा फडशा पाडतात. त्यांनी मध्ये तर! संतकवी महिपती महाराजांचा एक अभंग स्टुडिओमध्ये जाऊन गायिला.निबंध स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्यामध्येही बक्षीस मिळविले. प्रवास वर्णने लिहिली.या वयामध्ये या गोष्टी करणं सोपी बाब नाही.
आज वयाच्या ७५ व्या अर्थात अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण कतरताना या मंगलमय प्रसंगी
शेवटी एवढेच म्हणेन..
प्रसन्न मुद्रा,मुखी नाम, हाच जीवनाचा आपला अखेरचा ध्यास .
सदैव असता आपण सोबत
ज्ञान दानचा होतो दिप प्रज्वलीत,त्या प्रकाशाने जीवन होते आमचे प्रकाशित..
व्हावेत साकार स्वप्ने तुमची
घडावी हातून अशीच रत्ने आणखी
हिच विनंती श्री साई चरणी...
पप्रेरणादायी उत्साहमूर्ती-इनामदारताई

प्रसन्न मुद्रा,मुखी नाम,
हाच जीवनाचा आपला अखेरचा ध्यास .
सदैव असता आपण सोबत
ज्ञान दानचा होतो दिप प्रज्वलीत,त्या प्रकाशाने जीवन होते आमचे प्रकाशित..
व्हावेत साकार स्वप्ने तुमची
घडावी हातून अशीच रत्ने आणखी
हिच विनंती श्री साई चरणी...
लेखक -
परशुराम नागरगोजे,जामखेड