सारिका निमसे यांचा पिंपळगाव उंडा जि. प. प्रा. शाळेत सत्कार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2022 परीक्षेतून वर्ग 2 अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल सारिका संपत निमसे यांचा पिंपळगाव उंडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

पिंपळगाव उंडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सारिका संपत निमसे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2022 परीक्षेतून वर्ग दोन अधिकारी म्हणून निवड झाली आहे. या यशाबद्दल त्यांचे संपूर्ण शिक्षण विभागातून तसेच अन्य क्षेत्रातून कौतुक होत आहे. गटविकास अधिकारी प्रकाश पोळ व जामखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी श्रीमती निमसे मॅडम यांचे अभिनंदन केले आहे. 

आपल्या सोबत रोज कार्यरत असलेल्या एका महिला शिक्षिकेने प्रचंड मेहनत घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या पुढील काळात एक अधिकारी म्हणून पदभार सांभाळणार आहेत याचा शाळेतील सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना व पालकांना एक वेगळाच आनंद आहे त्याचाच एक भाग म्हणून शाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी श्रीमती निमसे मॅडम यांचा यथोचित सन्मान केला आहे यावेळी. पिंपळगाव उंडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक गायकवाड हनुमंत, मुख्याध्यापक पाटील नवनाथ, भालेराव सदाशिव, पिंपरे प्रमोद, ढगे प्रविण, हजारे ब्रम्हदेव पालक व विद्यार्थी उपस्थित होते. 


Post a Comment

Previous Post Next Post