गोकुळ गायकवाड यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान


       जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त नागपूर येथे रविवार ३१ मार्च २०२४ रोजी ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व विचारवंत मा डॉ श्रीपाल सबनीस पुणे यांचे शुभहस्ते श्री गोकुळ श्रीरंग गायकवाड यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

   श्री गोकुळ गायकवाड  यांच्या ३५ वर्षाच्या सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक ,आणि  धम्म कार्यातील योगदानाबद्दल हा यथोचित सन्मान करण्यात आला आहे.  
   मा डॉ वैशाली प्रधान प्राचार्य मिलिंद 
महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर, मा डॉ सुनील रामटेके जेष्ठ साहित्यिक व नाटककार,  मा डॉ विद्याधर बन्सोड सुप्रसिद्ध साहित्यिक व कादंबरीकार , आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष व जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मा डॉ दीपकुमार खोब्रागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा विदर्भ हिंदी साहित्य संमेलन मधुरम सभागृह झांसी राणी चौक सीताबर्डी नागपूर येथे संपन्न झाला.
यावेळी राज्यभरातील अनेक नामवंत साहित्यिक व विचारवंत उपस्थित होते.
 गिरलगाव ता. भूम जि. धाराशिव या लहानशा खेडेगावातील  गोकुळ गायकवाड यांनी बिकट परिस्थितीत शिक्षण घेऊन नौकरी करत करत उच्च शिक्षण घेतले.त्यांनी  सामाजिक धार्मिक शैक्षणिक कार्यात ठसा उमटवला आहे. धम्मपदा बोलती दोहे आणि गाथा (वैचारिक लेखन) या ग्रंथाचे माध्यमातून त्यांनी साहित्य क्षेत्रात दमदार पाऊल टाकले आहे. या ग्रंथास राज्यस्तरीय तीन पुरस्कार मिळाले आहेत. तर  माझा गाव माझी माणसं या चरित्र ग्रंथास चार राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार मिळाले आहेत. ताटातूट हा हृदयस्पर्शी कथा संग्रह लवकरच प्रकाशित होत आहे.
    गोकुळ गायकवाड यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाले बद्दल मा गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे साहेब,   नगराध्यक्ष मा निखिल घायतडक,  सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, शाहिर बाबासाहेब राजगुरू, संदेश घायतडक, रत्नाकर सदाफुले, अनिल सदाफुले, संभाजी आव्हाड, शेखर घायतडक, सह सामाजिक धार्मिक, शैक्षणिक,साहित्यिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले .

Post a Comment

Previous Post Next Post