गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते पिंपरखेड शाळेत रोबोटिक्स किड्स लॅबचे उद्घाटन

                                                     शालेय विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स लॅबच

    जामखेड प्रतिनिधी : विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरखेड मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक विज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या व्यावहारिक वापरावर आधारित रोबोटिक्स लॅबची स्थापना केली आहे. 
या रोबोटिक्स किड्स लॅब'चे उद्घाटन गटशिक्षाधिकारी मा. श्री. बाळासाहेब धनवे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.

    उद्घाटन समारंभात बोलताना धनवे साहेब म्हणाले की, ही लॅब विद्यार्थ्यांना या युगात प्रचलित असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मूलभूत तत्त्वांची ओळख करून देईल ज्याद्वारे विद्यार्थी त्यांच्या सर्जनशील विचारांचा वापर करून रोबोट आणि ड्रोन बनवू शकतात.

    सध्या ही मिनी प्रयोगशाळा पिंपरखेड जिल्हा परिषद शाळेत प्रयोग म्हणून सुरू करण्यात आली आहे. प्रयोगशाळेचा वापर करून विद्यार्थी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करू शकतील आणि राष्ट्र उभारणीत हातभार लावतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

    ते म्हणाले की या प्रयोगशाळेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इतर शहरी विद्यार्थ्यांप्रमाने आधुनिक तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळणार आहे. या प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात समाविष्ट असलेले प्रयोग शिकता येतात आणि स्वतः प्रयोग करता येतात. इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंतचे विद्यार्थी या लॅबचा उपयोग करतील.

    या प्रसंगी प्रवीण शिंदे सर यांनी यांनी रोबोटिक्स लॅबच्या उद्घाटनाबाबत आनंद व्यक्त केला कारण यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्याना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा परिचय होत आहे. या मिनी प्रयोगशाळेच्या मदतीने विद्यार्थी आधुनिक तंत्रज्ञानाच्या आवश्यकतेशी जुळवून घेण्यास आणि त्यांचे सर्जनशील विचार आणि तांत्रिक कौशल्ये विकसित करण्यात यशस्वी होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

    त्यांनी रोबोटिक स्पर्धा आयोजित केल्या जातात, ज्यामध्ये शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांनीही उत्साहाने भाग घेता येईल. या स्पर्धांनंतर ही लॅब विद्यार्थ्यांना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्याची संधी देईल.

    या मिनी लॅबची रचना अशा रंजक पद्धतीने करण्यात आली आहे की, यामुळे विद्यार्थ्यांची मौजमजा करताना सर्जनशीलता वाढेल आणि कंटाळा दूर होईल.

    प्रसंगी उपस्थित असलेले आदर्श पदवीधर शिक्षक श्री मुकुंदराज सातपुते यांनी या मिनी रोबोटिक्स प्रयोगशाळेच्या उद्घाटन प्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व या ज्ञानाचा पुरेपूर फायदा घेण्याचे विद्यार्थ्यांना सांगितले

    या प्रसंगी शाळेने विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल विजेते स्पर्धा विद्यार्थी व शिक्षक यांचाही सन्मान करण्यात आला.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री भोसले सर यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सरोदे सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री इंगोले सर यांनी केले.

    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री कोथमिरे सर, श्री भगवान साळुंखे सर, श्री मधुरकर सर व श्रीमती जरे मॅडम यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post