व्यापाऱ्यास मारहाण प्रकरणी जामखेड येथील व्यापाऱ्यांनी केला निषेध व्यक्त

आपघातील जखमींच्या बिलावरुन व्यापाऱ्यास मारहाण, एकुण सात जणांविरोधात गुन्हा दाखल 

जामखेड प्रतिनिधी 
अपघातातील जखमींच्या दवाखान्याचे बील देण्याच्या कारणावरून झालेल्या वादामुळे जामखेड येथील व्यापाऱ्यास मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी एक जणांसह इतर सहा अनोळखी अशा एकूण सात जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी व्यापाऱ्यांनी आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्यासाठी तहसीलदार व पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे व व्यापाऱ्यांच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला. 

याबाबत अधिक माहिती अशी की, जामखेड येथील व्यापारी नितीन कचरदास बाफना यांच्या मालकीच्या पीकअप गाडीचा त्यांच्या चालकांकडून सहा दिवसांपूर्वी अपघात घडला होता. या अपघातात पीकअप गाडीने रिक्षा ला धडक दिली होती. यात एकुण पाच जण जखमी झाले होते. यातील काही जखमींवर जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या जखमींच्या बीलाचा खर्च जखमीचे नातलग हे व्यापारी नितीन बाफना यांना मागत होते. 

बुधवार दि. २९ रोजी दुपारी व्यापारी नितीन बाफना हे आपल्या दुकानात बसले होते. यावेळी त्या ठिकाणी सुरज राऊत (पुर्ण नाव माहिती नाही) त्याच्या सोबत इतर सहा जण अनोळखी होते. यावेळी बीलांच्या कारणावरून फिर्यादी व आरोपी मध्ये भांडणे सुरू झाली. तुम्ही दवाखान्याचा व औषध उपचाराचा खर्च का दिला नाही असे म्हणत पैसे मोजण्याचे मशीन, पीव्हीसी पाईपचे दरवाजा बंद करण्याची लोखंडी प्लेट व पाईपने मारहाण करत व्यापारी नितीन बाफना यांना जखमी केली. या झटपटीत फिर्यादी यांच्या गळ्यातील सहा तोळ्याची सोन्याची चैन गहाळ झाली. 

या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला व्यापारी नितीन बाफना यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष कोपनर करत आहेत.

मारहाण प्रकरणी व्यापाऱ्यांच्या वतीने केला घटनेचा निषेध

निषेध करण्यासाठी आलेले व्यापारी 
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, प्रसिद्ध युवा उद्योजक आकाश बाफना, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस राजेंद्र कोठारी,  भारतीय जैन संघटना जिल्हा सचिव प्रफुल्ल सोळंकी, मा. नगराध्यक्ष विकास राळेभात, साखर सम्राट अशोक चोरडिया, संतोष नवलाखा, निलेश दुधेडिया ,कांतीलाल कोठारी, मनोज दुगड, विजय बोगवत, सुनील कोठारी, अभय चोपडा ,संदीप भंडारी, सुभाष भंडारी ,तुषार बोरा ,अमोल तातेड, अमोल जैन, सागर भळगट , अनिल बाफना, अभय बाफना, रवींद्र छाजेड, अनिल पितळे ,प्रवीण बाफना, अनिल गुंदेचा, यश बाफना, दिलीप गुगळे, निलेश बोरा ,महावीर बाफना, हिम्मत गांधी, आनंद गांधी ,राहुल राखेचा, हर्ष बाफना ,आनंद नहार ,कुणाल चोरडिया, राहुल गांधी ,कांतीलाल भळगट, प्रवीण छाजेड ,निलेश भंडारी, अशोक शिंगवी ,प्रवीण गांधी ,संदीप भंडारी, हुकुमचंद बोरा ,सुंतीलाल गांधी ,रोनित बाफना ,संतोष लोढा ,मंगेश बेदमुथा, संतोष फिरोदिया ,अभय बोरा, योगेश जसाभाटी, कैलास शर्मा ,संतोष बोथरा, अशोक गांधी ,कांतीलाल भळगट, कांतीलाल बोथरा, जितेंद्र बोरा ,विनोद बेदमुथा, सुनील चोरडिया, विनोद बोरा ,प्रशांत बोरा, ललित भंडारी, सागर गुंदेचा,आदी व्यापारी उपस्थित होते
व्यापाऱ्यास झालेल्या मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ शहरात पसरताच आज गुरूवार दि. ३० रोजी व्यापारी व नागरीकांच्या वतीने सकाळी अकरा वाजेपर्यंत आपली दुकाने बंद ठेवून घटनेचा निषेध केला. तसेच तहसीलदार गणेश माळी व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देऊन तातडीने आरोपींना अटक करावी व कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. निवेदन देता वेळी शहरातील सर्व व्यापारी व नागरीक उपस्थीत होते.

Post a Comment

Previous Post Next Post