श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड,
संत वामनभाऊ महाराज यांच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथीनिमित्त श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथे शनिवार दि. ३ जानेवारी २०२६ रोजी सोहळयास प्रारंभ झाला. गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री.विठ्ठल महाराज यांच्या शुभहस्ते अग्नी प्रज्वलित करून महायज्ञानाला प्रारंभ झाला.
सकाळी परंपरेप्रमाणे संत वामनभाऊ महाराज व श्री. गहिनीनाथ महाराज यांची विधीवत पुजा करण्यात आली. संत वामनभाऊ महाराज यांच्या पादुका पुजन करुन पादुका पालखीत ठेवण्यात आल्या. व टाळ मृदंगाच्या गजरात दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली. खालच्या गहिनीनाथ गडाचे पूजन करून नंतर महंत श्री विठ्ठल महाराज यांच्या हस्ते विना पूजन करून सप्ताहास प्रारंभ झाला. नंतर गाथा भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, संत वामनभाऊ महाराज यांचे जीवन चरित्र, प्रवचन, हरिपाठ सायंकाळी किर्तन हे सर्व कार्यक्रम पार पडले. यानिमित्ताने गडावर मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. आलेल्या भक्तांसाठी येथे दिवसभर अन्नदान सुरू होते. यावेळी आमदार सुरेश धस माजी आमदार भीमराव धोंडे माजी आमदार सुरेश नवले यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. त्याचबरोबर राज्यभरातून अनेक नामवंत महाराज मंडळी यावेळी उपस्थित होती.
गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 3 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान भव्य सुवर्ण महोत्सव पुण्यतिथी सोहळा होणार आहे. या निमित्ताने येथे भव्य यज्ञ मंडप तर , भव्य किर्तन मंडप उभारण्यात आले आहे.
महाप्रसादा साठी एक हजार क्विंटल बुंदी ,व सात क्विंटल चिवडा बनवण्याची सुरवात झाली आहे.
संत वामनभाऊ महाराज यांच्या समाधी मंदिरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते १० जानेवारी रोजी सुवर्ण कलशाची स्थापना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांनी केले आहे.
फोटो सैजन्य...शरद गर्जे
_____
महाप्रसादा साठी जामखेडहून हरभरा डाळ
*संत वामनभाऊ महाराज यांचा ५० वा सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी सोहळा* गडाचे मठाधिपती महंत श्री.विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होत आहे. पुण्यतिथी साठी सुमारे वीस वर्षापासून जामखेडहून डाळ पाठवली जाते. सुरवातीला बरेच वर्ष तेथे लागेल तेवढी (30 क्विंटल डाळ) संकलीत व्हायची. जामखेडहून बरेच जण तेव्हापासून डाळ देतात. त्यात दरवर्षी एक एक क्विंटल डाळ देणारेही काही दाते आहेत.
परंतु जे नव्याने सहभागी होण्यास इच्छुक आहेत त्यांनी कृपया संपर्क साधावा. *आपण आपल्या स्वइच्छेनुसार* आपल्याला शक्य तेवढे दान करू शकता.
कमीत कमी *पाच किलो हरभरा दाळ* स्विकारली जाईल.
संपर्क - संतोष बारगजे, जामखेड 9503613999