राज्य तायक्वांदो स्पर्धेत वैष्णवी कदमला सुवर्ण



महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 

    राज्य कॅडेट तायक्वांदो स्पर्धेत अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या वैष्णवी कमदने सुवर्ण पदक पटकाविले. तर, इतर सहा खेळाडूंनी ब्राँझ पदकांची कमाई केली. 

    तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) यांच्या मान्यतेने वर्धा तायक्वांदो असोसिएशन ऑफ वर्धा संघटनेने राज्य कॅडेट तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत अधिकृत मान्यताप्राप्त 36 जिल्हा संटघटनांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. यामध्ये अहदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत एक सुवर्ण व सहा ब्राँझ पदके पटकाविली आहेत. यामध्ये वैष्णवी कदम हिने सुवर्णपदक पटकाविले, तर सुर्यप्रातपसिंह गर्जे, ओम गायकवाड, साक्षी बडे यांनी ब्राँझपदक, तर पुमसेमध्ये अर्थव शिंदे, सार्थक गोंडगे, कृष्णा चव्हाण यांनी ब्राँझपदक पटकाविले आहे.    

    या संघाचे क्युरोेगीचे प्रशिक्षक सुरेश वाघ, रवि यादव, व्यावस्थापक लक्ष्मण शिंदे, पुमसेचे प्रशिक्षक दिनेशसिंह राजपूत, महेश टेमक, गणेश धीवर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. 

    या सर्व खेळाडूंचे व प्रशिकांचे तायक्वांंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, अहमदनगर जिल्हा तायक्वांदोचे अध्यक्ष डॉ. एकनाथ मुंडे, उपाध्यक्ष किरण बांगर, जिल्हा सचिव संतोष बारगजे, सहसचिव अलताफ कडकाले, सचिन आगळे, शकील सय्यद, महादेव मगर अंबादास साठे, गोरक्षनाथ गालम, महेश मुरादे, संतोष परांडे, बाबा क्षीरसागर, सुरज शिंदे, सागर सानप आदींनी अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post